मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबई येथील एमएसईबी होल्डिंग कंपनी कार्यालय येथे नुकतीच उद्योजकांच्या संघटनेसोबत ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत मंत्री बोर्डीकर यांनी उद्योजकांच्या ‘निमा’ (NIMA – Nashik Industries and Manufacturers Associations) या नाशिक येथील संघटनेमार्फत वीज दराच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करावी. यामध्ये उद्योजकांचे प्रतिनिधी व महावितरणचे अधिकारी यांचा समावेश असेल. या समितीच्या अभ्यास गटामार्फत दोन महिन्यांत संघटनेच्या मागण्यांबाबत उपाययोजना सुचवाव्यात, असे निर्देश दिले
यावेळी आमदार सत्यजित तांबे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे संचालक योगेश गडकरी, संचालक (प्रकल्प) सचिन तालेवार, संचालक सतीश चव्हाण, मुख्य अभियंता श्री.लटपटे, श्री.पडळकर, मुख्य अभियंता श्री.भोळे, सुनील सूर्यवंशी, नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे (निमा) आशिष नहार, मनीष रावळ, उद्योजक प्रतिनिधी, एमएसईबी होल्डिंग कंपनी तसेच महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.