शनिवार, नोव्हेंबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दुष्काळी भागाला सुजलाम् सुफलाम् करणारे निळवंडे धरण! नगर जिल्ह्यातील एवढी शेती येणार सिंचनाखाली

मे 30, 2023 | 9:43 pm
in इतर
0
IMG 20230530 WA0020

दुष्काळी भागाला
सुजलाम् सुफलाम् करणारे
निळवंडे धरण!

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३१ मे २०२३ रोजी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी होत आहे. यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण ‍विखे पाटील उपस्थित राहणार आहेत. धरण लाभक्षेत्र परिसरातील शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून पाण्यासाठी असलेली प्रतिक्षा संपणार आहे. निळवंडे प्रकल्प नेमका काय आहे ? त्याच्या वैशिष्ट्याविषयी माहिती देणारा लेख…

Suresh Patil
– सुरेश पाटील 
(माहिती अधिकारी, माहिती जनसंपर्क महासंचलनालय)
मो. ७०२८५८६९१९

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरण जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा प्रकल्प ठरणार आहे. डावा, उजवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील १८२ गावांमधील ६८८७८ हेक्टर (१ लाख ७० हजार २०० एकर) शेतजमिन ओलिताखाली येणार आहे. सिन्नर तालुक्यातील ६ गावांमधील २६१२ हेक्टर शेतजमीन वगळता अहमदनगर जिल्ह्यातील ६६२६६ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे.

अकोले तालुक्यातील प्रवरा नदीवर निळवंडे धरण प्रकल्प साकार झाला आहे. निळवंडे धरणांचा पाणीसाठा २३६ दक्षलक्ष घनमीटर, ८.३२ टीएमसी ऐवढा आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा २२१.५० दक्षलक्ष घनमीटर ऐवढा आहे. धरणाची लांबी ५३३ मीटर आहे. सांडव्याची लांबी ७२ मीटर आहे. ५ सांडव्याद्वारे ३७०० क्यूमेक (घनमीटर प्रतिसेंकद) पाण्याचा विसर्ग होणार आहे. या धरण प्रकल्पासाठी एप्रिल २०२३ अखेर २३५१ कोटी रूपयांचा खर्च झाला आहे.

१४ जूलै १९७० रोजी प्रकल्पास ८ कोटी रूपयांची मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. २५ मार्च १९७७ रोजी १६ कोटी रूपयांची प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यानंतर २२ जून १९९३ रोजी २३४ कोटी रूपयांची दुसरी सु.प्र.मा मिळाली. ११ नोव्हेंबर २०२३ रोजी ७६० कोटी रूपयांची तृतीय सु.प्र.मा.मिळाली. २१ जून २०१७ रोजी २३७० कोटी रूपयांची चतुर्थ सु.प्र.मा मिळाली आहे. तर ८ मार्च २०२३ रोजी ५१७७ कोटी रूपयांची पंचम सुधारित प्रशासकीय मान्यता या प्रकल्पास मिळाली आहे.

निळवंडे प्रकल्पावर डावा कालवा, उजवा कालवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजना असे चार कालवे आहेत. डावा कालवा हा ८५ किलोमीटरचा असून या कालव्याच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मधील १३, संगमनेर ४३, राहाता ३७, श्रीरामपूर ३, कोपरगाव ११ व सिन्नर (नाशिक जिल्हा) ६ असे एकूण ११३ गावांमधील ४३८६५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

उजवा कालवा हा ९७ किलोमीटरचा असून या कालव्याच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मधील ११, संगमनेर ३७ व राहूरी २१ असे एकूण ६९ गावांमधील २०३९५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. अकोले तालुक्यातील उच्चस्तरीय पाईप कालव्याद्वारे २३२८ हेक्टर क्षेत्र व जलाशयावरील उपसा सिंचन योजना २२९० हेक्टर असून असे एकूण ६८८७८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

भूसंपादन सद्यस्थिती : –
धरणाच्या बुडीत क्षेत्रासाठी लागणारे १३१७.३५ हेक्टर क्षेत्र (१०० टक्के) ताब्यात आहे. तसेच कालव्यासाठी एकूण संपादन करावयाचे क्षेत्र १४२७.३६ हेक्टर आहे, ताब्यातील क्षेत्र १४२४.०९ हेक्टर आहे व संपादन करावयाचे उर्वरित क्षेत्र ३.२७ हेक्टर आहे. कालव्यासाठी ३.२७ हेक्टर क्षेत्र संपादनाची कार्यवाही प्रगतीत आहे. ऑगस्ट २०२३ अखेर सर्व भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होणार आहे. अशी माहिती या प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता यांनी दिली आहे.

पुनर्वसन सद्यस्थिती : –
ऊर्ध्व प्रवरा (निळवंडे 2) प्रकल्पामुळे एक गाव व एक वाडी पूर्णतः व 12 गावे अंशतः बाधित होत आहेत. बाधित झालेल्या गावांमधील लोकांचे पुनर्वसन पूर्ण झालेले आहे. असा हा बहुउद्देशीय निळवंडे धरण प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यांतील दुष्काळी व जिरायती भागांसाठी जीवनदायी ठरणार आहे. यात यत्किंचित शंका नाही.

– सुरेश पाटील 
(माहिती अधिकारी, माहिती जनसंपर्क महासंचलनालय)
मो. ७०२८५८६९१९

Nilwande Dam Canals Ahmednagar District

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शेती महामंडळाच्या जागांबाबत मंत्रिमंडळाने या प्रस्तावास दिली मान्यता

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – कॉलेज आणि गझल

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
joke

इंडिया दर्पण - हास्य षटकार - कॉलेज आणि गझल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011