मुंबई – नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर विविध आरोप होत असतानाच आता आणखी एक बाब समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यापूर्वीच वानखेडे यांच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. आता त्यांची कन्या निलोफर मलिक-खान हिने खुले पत्र लिहून अनेक बाबींचा खुलासा केला आहे. १२ जानेवारीच्या त्या रात्री नक्की काय काय घडलं, हे सर्व तिने कथन केले आहे. निलोफरचा पती समीर खानकडे १९४ ग्रॅम गांजा सापडला होता. त्याच्यासह पाच जणांवर आरोप ठेवण्यात आला. त्यांना अटक करण्यात आली होती.
निलोफर मलिक-खान हिने खुल्या पत्रात म्हटले आहे की, एनसीबीला आम्हाला जी वागणूक मिळाली ती अन्यायकारक होती. आम्ही ती कधीही विसरु शकत नाही. आम्हाला खुप वेदना होत आहेत. पुराव्याशिवाय समीर यांना अटक करण्यात आली. तसेच, अपमानजनक वागणूक देण्यात आली. माझ्या घरी आणि कार्यालयात अचानक आणि विनाकारण शोध मोहिम सुरू केली. सिक्युरिटी गार्डने मला कळवलं की एनसीबी अधिकारी आले आहेत. त्यानंतर मी तेथे पोहचेपर्यंत सर्व सामान अस्ताव्यस्त बघावे लागले. एनसीबीने खुप शोध घेतला पण त्यांना काहीच मिळाले नाही. पेडलरची पत्नी, ड्रग्स तस्कर अशी विविध नावे आमच्यापुढे जोडण्यात आली. आमच्या संपूर्ण कुटुंबाला याचा प्रंड त्रास सहन करावा लागला, असे पत्रात म्हटले आहे. निलोफर यांचे संपूर्ण पत्र खालीलप्रमाणे