गुरूवार, नोव्हेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

श्री निलमणी गणेश मंडळाची पालखीतून प्रथम मानाची महामिरवणुक

सप्टेंबर 9, 2022 | 6:08 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220909 WA0033 e1662727091279

मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द असणारा वेशीतील श्री निलमणी गणेश मंडळाच्या पार्थिव गणेश मुर्तीची विसर्जन महामिरवणुक पारंपारिक व धार्मिक संस्कृतीचे दर्शन घडवत सामाजिक उपक्रमांना देखील स्थान देत संपन्न झाली. आम्ही परंपरा पाळतो, आम्ही संस्कृतीचे रक्षण करतो हे ब्रीदवाक्य घेवून श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे १९९७ पासून यंदा सलग २६ व्या वर्षी या महामिरवणुकीचे सकाळी आयोजन करण्यात आले होते.

मनमाड पोलिस उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डी वाय एस पी) सौ श्री समीरसिंह साळवे यांच्या हस्ते मदिरात महाआरती होवून मिरवणुक शुभारंभाचा नारळ वाढविण्यात आला. यंदाच्या मिरवणुकीमध्ये मिरवणुक मार्गावर सुशोभित रांगोळी, महाराष्ट्राची लोकपरंपरा सांगणारे गोंधळी पथक मिरवणुकीची शिवकालीन दवंडी,वाद्यवृंद (बॅण्ड), सनई चौघडा, घोडे व उंटस्वार युवती, पारंपारिक वेशात श्री ढोल पथक मनमाड यांनी मिरवणुकीमध्ये ढोल वादनाची विविध प्रात्यक्षिके सादर केली आणि मानाच्या पालखी समोर चंद्र सूर्य, , (मानाची अब्दागिरी ) भगवा ध्वज,आणि सुगंधीत फुलांनी सजवलेली श्री निलमणीच्या पार्थिव मुर्तीची सुशोभित फुलानी सजवलेली पालखी, ही यंदाच्या मिरवणुकीची विशेष आकर्षणे ठरली.

श्री निलमणीच्या पालखीजवळ शंखनादाने श्री गणेशाच्या जयजयकाराने परिसर दुमदुमला. मिरवणुकीत मार्गावरील सर्वच राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना मंडळा तर्फे अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर मिरवणुकीत सर्व भाविकांना खडीसाखरेचा व मोदकाचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. या श्री निलमणीच्या पालखीतील पार्थिव मूर्ती ला मिरवणुक मार्गावर महिलांनी ठिकठिकाणी औक्षण केले. या श्री निलमणीच्या महामिरवणुकीचे संयोजन श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टचे विश्‍वस्त अध्यक्ष किशोर गुजराथी, सचिव नितीन पांडे, विश्वस्त शेखर पांगुळ, गोविंद रसाळ, , प्रज्ञेश खांदाट कृष्णा शिंपी यांनी केले. तर या मिरवणुकीत श्री निलमणी गणेश मंडळाचे रामदास इप्पर, संदीप शिनकर, भरत छाबडा, माजी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद,, शिवाजी सानप, दीपक शिंदे, अक्षय सानप, अभिषेक पितृभक्त ,सौ व श्री डॉ मिलिंद धारवाडकर ,राहुल लांबोळे,रितीक चव्हाण, मच्छीद्र साळी,सौरभ मुनोत, मनोज छाबडा, प्रणव ललवाणी शाम शाकद्विपी, किशोर आव्हाड, पंकज जाधव,पवन सानप, योगेश म्हस्के,रोहित कुलकर्णी,अक्षय छाबडा, जागृती आहेर, अथर्व गुजराथी,दिक्षा पांगुळ, ऐश्‍वर्या जोशी, निकीता ढासे, प्रणव ललवाणी, राजेश निकुंभ,संजय पठाडे, जव्हेरीलाल धांदल, उपेंद्र पाठक, महेश बोराडे,सचिन व्यवहारे ,सचिन वडक्ते आदी प्रमुखांसह श्री गणेश भक्त भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.या पारंपरिक मिरवणुकीस पहाण्यासाठी नागरिकांनी मिरवणूक मार्गावर दूतर्फा मोठी गर्दी केली होती मनमाड शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनात या मिरवणुकीसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्टतर्फे मिरवणुकीचे संयोजन करण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना बागायती आणि जिरायतीसाठी मिळणार या निकषाने मदत

Next Post

पावसात इलेक्ट्रीक पोलचा वीजप्रवाह पाण्यात उतरल्याने सायकलस्वार तरूण ठार

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
प्रातिनिधीक फोटो

पावसात इलेक्ट्रीक पोलचा वीजप्रवाह पाण्यात उतरल्याने सायकलस्वार तरूण ठार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011