मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनी नोटांवर भगवान गणेश आणि लक्ष्मीची छायाचित्रे प्रकाशित करण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले. या आवाहनावर राजकीय चर्चा सुरु असतांना भाजप नेते नितेश राणे यांनी भारतीय चलनावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असावा अशी मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करुन छत्रपतीं शिवाजी महाराजांचा फोटो असलेली २०० रुपयांची नोटही अपलोड केली आहे. त्यात त्यांनी यह फरफेक्ट है असे म्हटले आहे…..
https://twitter.com/NiteshNRane/status/1585225623471271937?s=20&t=ww_RKh9SCS8vjfjVsHfOhw