मुंबई – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर गेले काही दिवस सुरु असलेला वाद अजूनही शमन्याची चिन्हे नाहीत. अटक, जामीन, पत्रकार परिषद, आंदोलन एकीकडे सुरु आहे. तर दुसरीकडे सामनामधून सलग दोन दिवस राणे यांच्या विरोधात अग्रलेख लिहिण्यात आले. तर दुसरीकडे याला प्रतित्त्युर म्हणून भाजपचे नेते निलेश राणे हे सुध्दा ट्विट करत आहे. काल त्यांनी करारा जवाब मिलेगा… करारा जवाब मिलेगा…असे सांगणार चित्रपटातील व्हिडिओ ट्वीट केला. तर आज शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्या विरोधात त्यांनी ट्विट केले आहे.
https://twitter.com/NiteshNRane/status/1430738836192038915?s=20