मुंबई – बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोधकांना इशारा देत अशी थप्पड मारु की कोणी उठणार नाही असे सांगितले होते. आज त्यांच्या या विधानावर चिमटा काढत भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधत ट्विट केले आहे. या ट्विट मध्ये त्यांनी हरभट रोड सांगली येथे निवेदन देण्यासाठी रोषात आलेली ३०-४० लोकांची गर्दी पाहून घाबरुन मुख्यमंत्री ५ मिनिटात गाडीत लपून बसले असे म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री काल थप्पड मारण्याची वल्गना करत होते असे सांगत असे सांगत.. वाघ_म्हणे असा चिमटा काढला आहे.
आज सांगली येथे पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे असतांना हरभट रोड येथे भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यावेळी मुख्यमंत्री निवेदन स्विकारत नसल्याचा आरोप करुन त्यांनी ठिय्या आंदोलनही केले. त्यानंतर शिवसैनिकही आक्रमक झाले. पोलीसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तणावही निवळला. पण, या सर्व प्रकारावर भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी ट्विट करुन चिमटा काढला. खरं तर मुख्यमंत्र्यांनी येथे व्यापा-यांचे निवेदन घेतले. त्याचवेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचे बोलले जात आहे. पण, राजकारणात संधी साधून एकमेकांना निशाणा साधणे नवीन नाही.वाघ_म्हणे….गर्दी पाहून घाबरुन ५ मिनिटात गाडीत लपून बसले मुख्यमंत्री; निलेश राणेंचे ट्विट मध्ये त्यांनी एक व्हिडोओही शेअर केला आहे.
हरभट रोड सांगली येथे निवेदन देण्यासाठी रोषात आलेली ३०-४० लोकांची गर्दी पाहून घाबरुन "५ मिनिटात गाडीत" लपून बसलेले मुख्यमंत्री म्हणे काल "थप्पड मारण्याची" वल्गना करत होते.
वाघ_म्हणे… pic.twitter.com/bIyUvqCXl8
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) August 2, 2021