नवी दिल्ली – जीवनात आपल्या आवडीच्या क्षेत्रात किंवा मनासारखे काम करायचे असेल, तर तो कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करीत नक्कीच यशस्वी होतो, असे म्हणतात. अशा यशकथा आपण अनेक वेळा वाचतो आणि ऐकतो अशीच एक यशकथा आहे, दिल्लीतील एका तरुणीची. तिने परदेशातील चांगल्या प्रकारची नोकरी सोडून तिने भारतात परत येऊन चक्क लोणचे विकण्याचा व्यवसाय सुरू केला. विशेष म्हणजे ३ वर्षात यात कोट्यावधी रुपयांची कमाई केली.
कोणत्याही कामात चांगली सुरुवात केली आणि नियोजन केले तर यश मिळवायला वेळ लागत नाही. दिल्लीत लहानाची मोठी झालेली आणि लंडनमधून मार्केटिंगची पदवी मिळवलेली निहारिका भार्गव हिने आपल्या वडिलांच्या आवडीला व्यवसायात बदलून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. वास्तविक, तिच्या वडीलांना लोणचे बनवण्याची आवड होती, त्यामुळे ते लोणचे तयार करून नातेवाईकांना भेट म्हणून देत असत. त्यांनी बनवलेल्या लोणच्याला खूप मागणी होती.
मार्केटिंगचा अभ्यास आणि काही वर्षांचा नोकरीचा अनुभव घेतल्यानंतर, निहारिकाला समजले की, ती अशा प्रकारे स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकते आणि नाव कमवू शकते. त्यापुर्वी निहारिका भार्गवने दिल्ली विद्यापीठातून पदवी पूर्ण केली, त्यानंतर २०१५ मध्ये लंडनमधून मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि इनोव्हेशनमध्ये मास्टर्स केले. त्यानंतर ती भारतात परत आली आणि गुडगाव येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करू लागली. कंपनी चांगली असल्याने त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा आणि पगारही मिळत असे. पण वेगळे काहीतरी करून दाखवण्याच्या ध्येय्याने निहारिकाने एक वर्षानंतर ती नोकरी सोडली आणि लोणच्या व्यवसायात उतरली.
परंतु या व्यवसायात प्रवेश करण्यापूर्वी, निहारिका भार्गव यांनी लोणचे बाजार समजून घेण्यासाठी आणि संशोधन करण्यासाठी बराच वेळ घालवला. अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर तिला कळले की, शुद्ध आणि घरगुती लोणच्याची मागणी खूप जास्त आहे. बाजारातील लोणचे आवडत नाही, असे म्हणणारे खूप आहेत, त्यामुळे या लोकांना चांगले, चवदार, शुद्ध व घरगुती लोणचे खरेदी करायचे आहे.
लोकांची ही गरज समजून घेऊन निहारिकाने वडिलांचे लोणचे बनवण्याचे कौशल्य शिकलेच, पण त्याला व्यवसायाचे स्वरूपही दिले. तथापि, हा व्यवसाय चालेल की नाही, याची सुरुवातीला साशंकता होती, कारण जवळपासच्या सर्व घरात लोणचे तयार केले जाते होते. पण तिने धिर सोडला नाही. ती आपले काम करत राहिली. सुरुवातीला ती दिल्ली आणि आसपासच्या प्रदर्शनात तिचे लोणचे स्टॉल लावत असे. लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर त्याने स्थानिक बाजारातही लोणचे द्यायला सुरुवात केली.
गुडगाव येथे २०१७ मध्ये तिने ‘ द लिटल फार्म ‘ कंपनीची स्थापना केली, आणि आपली उत्पादने ऑनलाईन विकायला सुरुवात केली. तेच काम चांगले केल्यानंतर या कंपनीची उलाढाल ३ वर्षांनी एक कोटीवर पोहोचली. आता ही कंपनी सध्या ५० हून अधिक प्रकारची लोणची विकते. त्यापैकी आंबा आणि गुळाच्या लोणच्याला जास्त मागणी आहे. यासोबतच ही कंपनी हळद, कच्चे घनी तेल, जाम, संपूर्ण तिखट यासारख्या वस्तूंची विक्री करते.
निहारिका रासायनिक पदार्थ उत्पादनात वापराच्या विरोधात आहे . कारण त्यांच्या लोणच्यामध्ये वापरलेले सर्व घटक सेंद्रिय पद्धतीने घेतले जातात. मध्य प्रदेशातील खजुराहो येथे त्याच्या वडिलांनी ५० एकर शेती घेतली आहे, जिथे दरवर्षी ३० टनांपेक्षा जास्त फळ उत्पादन घेतले जात आहे. आंबा, आवळा, लिंबू, हळद, आले, मिरचीसह अनेक झाडे त्याच्या शेतात लावली असून त्या फळांचे आणि भाज्यांचे लोणचे बनवण्यासाठी वापर केला जातो. याशिवाय येथे फळे आणि भाज्यांचे उत्पादनही केले जाते. आणि ती बाजारात विकले जातात.
निहारिकाबरोबर काम करणा या बहुतेक महिला आहेत. सध्या शेतात १५ महिला आणि ३ पुरुष आहेत. तिने एका एनजीओ सोबत भागीदारी केली आहे. त्यामार्फत महिला सक्षमीकरण, विकसन आणि पाककृती निर्माण आदी काम करण्यात येते. सध्या द लिटल फार्म कंपनीची सुमारे ४०० एकर हिरवीगार शेती आहेत, काही जमीन सर्वात प्रदूषणमुक्त क्षेत्रांपैकी एक आहे, येथे सेंद्रीय पद्धतीच्या मदतीने फळे, भाज्या आणि मसाले पिके घेतले जातात. आजच्या तरुण मंडळींनी निहारी कसा आदर्श घेऊन कोणत्याही व्यवसायात यशस्वी होणे शक्य आहे.