नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दैनिक देशदूतचे संस्थापक आणि उद्योजक देवकिसनजी बस्तीरामजी सारडा (९२) यांचे नाशिक येथे आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार रोजी, दुपारी ५.३० वाजता, त्यांचे निवासस्थान, A- 38, नाईस वसाहत, सातपुर येथून द्वारका अमरधाम येथे निघेल. तर अंतिम संस्कार संध्या. ६.१५ वाजता विद्युतदाहिनी मध्ये होणार आहे. देवकिसन सारडा यांनी औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले.