नांदगाव – बाणगाव बुद्रुक येथील होतकरू वाहतूक व्यावसायिक बापूसाहेब अशोक कदम (३६) यांचे आज निधन झाले अतिशय सामान्य कुटूंबातून हलाखीचे दिवस काढीत व पुढे येत स्वतःच्या बळावर त्यांनी सुरुवातीला दुसऱ्यांच्या वाहनावर क्लिन्नर म्हणून काम करण्यास सुरुवात करीत नंतरच्या काळात स्वतःचा वाहतूक व्यवसाय नावारूपाला आणला होता त्यांच्या अकाली निधनबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सकाळचे बातमीदार बाबासाहेब कदम यांचे ते लहान बंधू होत आमदार सुहास कांदे माजी आमदार अँड अनिल आहेर जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे बाजार समितीचे सभापती तेज कवडे आदी सह नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ,नांदगाव तालुका पत्रकार संघ यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी दुःख व्यक्त केले.