मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. प्रियांकाने नुकताच तिचा ४०वा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिचे सारे कुटुंबीय या सेलिब्रेशनला हजर होते. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी यंदा तिने मेक्सिकोची निवड केली. पती निक जोनास आणि कुटुंबातील सदस्यांसह मॅक्सिकोमध्ये जल्लोषात तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रियांका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असल्याने तिच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता याच सेलिब्रेशनमधला एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
प्रियांकाच्या वाढदिवसाच्या सगळ्याच फोटोंना चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. पण त्यातही एका व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कंमेंट्सचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओमध्ये निक जोनस आणि प्रियांका एकमेकांना किस करताना दिसत आहेत. तर निक जोनस हा प्रियांकाची आई आणि त्याची सासू मधू चोप्रा यांच्याबरोबर डान्स करताना दिसत आहे. प्रियांका सध्या हॉलिवूडच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. ‘सिटाडेल’ या वेब सिरीजवर ती काम करते आहे. याचे दिग्दर्शन ‘अॅव्हेंजर्स’ फेम रुसो बंधूंनी केले आहे. ती पुढच्या वर्षी ‘जी ले जरा’ या हिंदी चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे.
Nick Jonas Dance Video Viral









