नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भगवान महावीर यांच्या जीवन चरित्रावर आधारीत ‘राज्यस्तरीय निबंध स्पर्धा’ महाराष्ट्र शासनाच्या भगवान महावीर स्वामी 2550 वा निर्वाण कल्याणक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित केली होती. या स्पर्धेत संपूर्ण राज्यात नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग हा सर्वाधिक होता. यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचा महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सरकारतर्फे भगवान महावीर स्वामी यांच्या २५५० व्या निर्वाण कल्याणक निमित्त गठीत समितीतर्फे भगवान महावीर यांच्या जीवन चरित्रावर आधारीत ‘राज्यस्तरीय निबंध स्पर्धा’ आयोजित केली होती या निबंध स्पर्धेत सर्वाधिक विद्यार्थी सहभागी जिल्हा श्रेणीमध्ये नाशिक जिल्ह्याचा ‘प्रथम’ क्रमांक आला असुन याबद्दल जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचा महामहिम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते रविवार २ फेब्रुवारी २०२५ रोजी राजभवन, मुंबई येथे आयोजित गौरव समारंभात सन्मान करण्यात येणार आहे.