मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यालयांवर देशभरात छापेमारी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सुरु केली असून मालेगावमध्ये सुध्दा पहाटे एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सैफु रहेमान असे त्याचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात पुणे, नवी मुंबई, भिवंडी या ठिकाणी सुध्दा ही छापेमारी सुरू आहे. मालेगावमधून एटीएसने एकाला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या छापेमारीबाबत अंत्यत गोपनीयता बाळगण्यात आली. त्यामुळे अधिकृत माहिती अद्याप पुढे आलेली नाही. दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयएकडून ही छापेमारी सुरू आहे. पीएफआयचे महाराष्ट्रातील मुख्य कार्यालय पुण्यातील कोंढवा भागात आहे. येथे काही ठिकाणी प्रशिक्षण केंद्र चालवले जात असल्याचेही समोर आले आहे.
अनेक ठिकाणी छापे
पहाटेच्या या कारवाईत एटीएसने महाराष्ट्रने औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई येथे मोठ्या प्रमाणात छापे टाकले. तर मुंबई, नाशिक औरंगाबाद आणि नांदेड येथे आयपीसीच्या विविध कलमांतर्गत (१५३ अ, १२१ अ, १०९, १२० ब) आणि यूएपीए कलम १३(१) (ब) मध्ये समाजात वैर वाढवणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि कट रचल्याबद्दल चार गुन्हे दाखल केले आहेत. पीआयएफशी संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD