मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगावमध्ये राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)च्या एकाला ताब्यात घेतल्याच्या वृत्ताने खळबळ निर्माण झाली होती. पण, मालेगाव प्रमाणे असेच हे छापे कोल्हापूरमध्ये सुद्धा टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील या दोन शहराबरोबच पाच राज्यात १४ ठिकाणी हे छापे एकाच दिवशी टाकण्यात आले. यात केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि बिहार राज्यात समावेश आहे. या छाप्यात डिजीटल उपकरणे, कागदपत्रे एनआयएने ताब्यात घेतली आहेत.
एनआयएने एप्रिल २०२२ मध्ये दिल्लीत पीएफआय विरोधात गुन्हा दाखल केला होता. गेल्या वर्षी केंद्र सरकारने पीएफआय आणि त्याच्याशी संलग्न संघटनांवर पाच वर्षांसाठी बंदी घातली होती. त्यादरम्यान अनेक पीएफआय नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर मार्च २०२३ मध्ये त्यापैकी १९ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. २०४७ पर्यंत भारतात इस्लामिक राज्य स्थापन करण्यासाठी पीएफआय प्रयत्नशील असल्याचा आरोपामुळे गृहमंत्रालयाने पीएफआयवर बंदी घातली आहे.
पीएफआय चे हस्तक ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून काम करत असल्याचा एनआयएला संशय आहे. ते देशाच्या विविध राज्यांमध्ये शस्त्रास्त्र प्रशिक्षण शिबिरे आयोजित करत आहेत. कट्टरतावादी पीएफआय केडर्सना शस्त्रे, लोखंडी रॉड, तलवारी आणि चाकू वापरण्याचे प्रशिक्षण देत आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून विविध राज्यांमध्ये एनआयए अनेक ठिकाणी छापे टाकत आहे.
NIA raids at 14 locations in five states NIA Kolhapur Malegaon Raids PFI Terrorists