नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दहशतवादाविरोधातील मोहिमेत राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज सकाळपासून मोठी कारवाई सुरू केली आबे. या दोन्ही तपास यंत्रणांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संस्थेच्या जवळपास ११ राज्यांमधील पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर छापे टाकल्याचे वृत्त आहे. यादरम्यान १०० हून अधिक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर कर्नाटक, केरळमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला आहे.
एनआयएने दहशतवादाला आर्थिक मदत, प्रशिक्षण शिबिरांमध्ये गुंतलेल्यांच्या निवासस्थानांची आणि अधिकृत ठिकाणांची झडती घेतल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये एनआयएचे छापे सुरूच आहेत. तपास यंत्रणेने जवळपास १०६ ठिकाणी छापे टाकल्याचे वृत्त आहे.
महाराष्ट्रात २०, राजस्थानमध्ये २, मध्य प्रदेशात ४, दिल्लीत ३, उत्तर प्रदेशात ८, तामिळनाडूमध्ये १०, आसाममध्ये ९, केरळमध्ये २२, कर्नाटकात २० आणि आंध्र प्रदेशात ५ जणांना अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पीएफआयच्या राज्य आणि जिल्हा पातळीवरील नेत्यांच्या घरांवर तपास यंत्रणांनी छापे टाकले आहेत. यासोबतच मलप्पुरम जिल्ह्यातील मंजेरी येथील पक्षाचे अध्यक्ष सलाम यांच्यावरही तपास यंत्रणांनी कारवाई केली असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. सलाम याच्यावरील कारवाईविरोधात पक्ष कार्यकर्त्यांची निदर्शने सुरूच आहेत. गुरुवारी मोठ्या संख्येने जमलेल्या कामगारांनी घोषणाबाजी केली.
रविवारीही छापे
गेल्या रविवारीही एनआयएने आंध्र प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये छापे टाकले होते. त्यादरम्यान पीएफआय सदस्यांना चौकशीसाठी नेण्यात आले. तपास यंत्रणेने हिंसाचार आणि बेकायदेशीर कृत्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये कारवाई केली होती. त्यादरम्यान, एनआयए अधिकाऱ्यांच्या २३ पथकांनी निजामाबाद, कुरनूल, गुंटूर आणि नेल्लोर जिल्ह्यात ३८ ठिकाणी शोध घेतला होता.
NIA ED Raid 11 State 106 Places 100 persons Arrested
Terrorism PFI Popular Front of India
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD