मुंबई – महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस अधिकारी सचिव वाझेला महिन्याला १०० कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचे प्रकरण पुढे आल्यानंतर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सक्रीय झाले आहे. आता ईडी लवकरच एनआयएला सविस्तर माहिती मागणार आहे. परमबीर सिंह यांच्या आठ पानी पत्रातील तथ्य तपासण्यासाठी ईडी मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत तपास सुरू करण्याची शक्यता आहे.
आरोपांत तथ्य असेल तर…
ईडीतील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की, परमबीर सिंह यांच्या आरोपात तथ्य असेल तर वर्षाचा हजारो कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण पुढे येऊ शकते. त्याच्या खोलात जाऊन तपास करावा लागणार आहे. अवैध वसुलीच्या माध्यमातून जमा केलेली संपत्ती जप्त करणे ईडीचे काम आहे.
खऱ्या कारणाचा खुलासा नाही
सचिन वाझेच्या चौकशीत बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला असला तरीही त्याने अद्याप खऱ्या कारणाचा खुलासा केलेला नाही. अर्थात अंबानींच्या घराबाहेर स्कॉर्पियो उभी करण्यामागचा उद्देश अद्याप कळू शकलेला नाही. अंबानींच्या मनात दहशत निर्माण करून मोठी रक्कम वसूल करण्याचे षडयंत्र रचले जात होते आणि त्यात वाझे स्वतः अडकून पडले, असा अंदाज ईडीतील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
अंबानींकडून वसुली करणे वाझेचे काम नाही
मुकेश अंबानीला घाबरवून वसुली करणे एकट्या वाझेच्या क्षमतेतील काम नाही. यात आणखीही मोठे लोक सामील असण्याची शक्यता आहे. याची शक्यता परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे अधिक बळावली आहे.