इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक – मुंबई प्रवाशांनी प्रवास करतांना ही बातमी काळजीपूर्वक वाचा.. या मार्गावरील जुना कसारा घाट बाबत माहिती देण्यात आली आहे. डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आल्यामुळे जुना कसारा घाट सोमवार २४ फेब्रुवारी २०२५ ते शुक्रवार दि. २९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान दररोज सकाळी ९ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे.
याबाबत NHAI ने माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मुंबई -ं नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वरील जुना कसारा घाट (मुंबई ते नाशिक दिशेने) मध्ये भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण -ं नाशिक यांच्या सवलतदारा मार्फत नियतकालिक डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून जुना कसारा घाट सोमवार २४ फेब्रुवारी २०२५ ते शुक्रवार दि. २९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान दररोज सकाळी ९ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. सदर काळात मुंबई ते नाशिकच्या वाहतुक ही नवीन कसारा घाटातुन वळविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.