सोमवार, सप्टेंबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अरे….एनएफएआयचे फिल्म पोस्टर प्रदर्शन बघितले का ? नक्की बघा..

by Gautam Sancheti
ऑगस्ट 28, 2021 | 12:10 am
in संमिश्र वार्ता
0
4FQT1

 

पुणे – देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संपूर्ण देशभरात, “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साजरा केला जात आहे. याचाच भाग म्हणून, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या पुणे विभागाने, एका विशेष आभासी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. “चित्रांजली@75: अ प्लॅटिनम पॅनोरामा” असे या प्रदर्शनाचे शीर्षक आहे. दृश्य दस्तऐवजांचा पॅनोरामा असलेल्या या ऑनलाईन प्रदर्शनात, देशालां स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच्या ७५ वर्षांतील ठळक घटनांचा मागोवा घेण्यात आला आहे. या डिजिटल संग्रहात, भारतीय चित्रपटातून, देशाच्या स्वातंत्र्यसेनानींचे आणि आपल्या वीर सैनिकांचे शौर्य आणि बलिदानाच्या गाथांचे गौरवगान चित्रित केलेले आहे. या प्रदर्शनात, अशा चित्रपटांचीही झलक आहे, ज्यातून हाताळण्यात आलेल्या सामाजिक प्रश्नांचा जनमानसावर परिणाम झाला आणि त्यातून सामाजिक सुधारणांचा मार्ग मोकळा झाला. तसेच, आपल्या सैनिकी गणवेशातले आपले नायक- आपल्या जवानांच्या शौर्यगाथांची झलक या प्रदर्शनात आपल्याला बघायला मिळेल.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ‘आयकॉनिक विक ऑफ आझादी का अमृत महोत्सव’ या विशेष उपक्रमाचा भाग म्हणून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन करतांना, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, भारतीय सिनेमा ही देशाची सॉफ्ट पॉवर असून जागतिक व्यासपीठावर भारताची ओळख निर्माण करण्यात या चित्रपटसृष्टीचे योगदान महत्वाचे आहे.
2GNNS

आभासी प्रदर्शनाविषयी माहिती :
‘चित्रांजली@75’, प्रदर्शनात, ७५ फिल्म पोस्टर्स तसेच छायाचित्रांच्या माध्यमातून भारतातल्या विविध भाषांमधील चित्रपटातले देशभक्तीचे विविध रंग दाखवण्यात आले आहेत. हे प्रदर्शन तीन भागात विभागण्यात आले आहे. “सिनेमाच्या कॅमेरा नेत्रातून स्वातंत्र्यलढा’, ‘सामाजिक सुधारणांविषयीचे चित्रपट’ आणि ‘वीर सैनिकांना सलाम’ असे हे तीन विभाग आहेत.

‘सिनेमाच्या कॅमेरा नेत्रातून स्वातंत्र्यलढा’- या विभागात, आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या रोमहर्षक कथा विविध भाषांमधील चित्रपटातून दाखवण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्यसेनानींचे शौर्य आणि त्याग याला चित्रपटातून सर्वसामान्यांपर्यंत अत्यंत प्रभावीपणे पोचवण्यात आले आहे आणि या वीरगाथा पुढेही अनेक पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या ठरतील.

‘‘सामाजिक सुधारणांविषयीचे चित्रपट’’- या विभागात, भारतीय चित्रपट आणि विसाव्या शतकातील सुरुवातीच्या दशकातला राष्ट्रीय स्वातंत्र्यलढा यांच्यातील परस्परसबंध दर्शवण्यात आला आहे. जनशक्तीला एकत्रित आणण्याची चित्रपटांची ताकद यात आपल्याला अनुभवता येते. प्रत्ययकारी दृश्यांच्या आणि गीतांच्या माध्यमातून लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे देखील सिनेमाच्या माध्यमातून करता येते. अनेक सामाजिक सुधारणांच्या चळवळी देखील या चित्रपटांतून दाखवण्यात आल्या आहेत. त्या काळात झालेल्या या चळवळीवरच्या चित्रपटांमुळे समाजात आलेली मरगळ दूर होऊन नवे चैतन्य निर्माण झाले होते.

‘सॅल्यूटिन्ग द ब्रेव्ह सोल्जर्स ‘ ही सशस्त्र दलांच्या शौर्याला योग्य आदरांजली आहे , आपल्या चित्रपटातूनही ही संकल्पना वारंवार मांडली आहे. या विभागात प्रदर्शित झालेल्या युद्ध चित्रपटांनी आपल्या देशातील सैनिकांचे निःस्वार्थ हौतात्म्य आणि अमरत्वाची आभा निर्माण करण्यात यश मिळवले आहे. गणवेशातील नायकांना सलाम करण्यासाठी प्रदर्शनातत्यांची पोस्टर्स ठेवण्यात आली आहेत.
332Q9

या प्रदर्शनात समाविष्ट केलेले काही उल्लेखनीय चित्रपट पुढीलप्रमाणे-
1857 (हिंदी , 1946) – सुरेंद्र आणि सुरैया अभिनित या ऐतिहासिक काल्पनिक चित्रपटाला पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाची पार्श्वभूमी आहे.
42 ‘उर्फ बियालीश (बंगाली, 1949) – हा चित्रपट भारताच्या 1942 च्या चळवळीचा अस्वस्थ काळ सविस्तरपणे दाखवतो.
पियोली फुकन (आसामी,1955) – हा चित्रपट आसामच्या एका ऐतिहासिक पात्राच्या जीवनावर आणि संघर्षावर आधारित आहे, पियोली फुकन हा बदान बोरफुकनचा मुलगा आहे , ज्याने ब्रिटिशांविरोधात बंड केले होते. . त्याला फाशीची शिक्षा झाली आणि 1830 मध्ये जोरहाट येथे फाशी देण्यात आली.
कडू मकरानी (गुजराती, 1960) – ब्रिटिश राजवटीला विरोध करणाऱ्या काथियावाडच्या कडू मकरानी उर्फ पूर्वेकडील रॉबिनहुडचे कार्य हा चित्रपट सर्वांसमोर मांडतो.
कित्तूर चेन्नम्मा (कन्नड,1961) – कन्नड भाषेतील ऐतिहासिक नाट्यमय चित्रपट ज्याची निर्मिती आणि दिग्दर्शन बी .आर.पंथुलू यांनी केले होते, बी. सरोजा देवी यांनी कित्तूर चेन्नम्माची भूमिका साकारली होती. चेन्नमा यांनी 1824 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध सशस्त्र बंडाचे नेतृत्व केले.
पदांदी मुंडुकू (तेलुगू, 1962) – महात्मा गांधींच्या दांडी मीठ सत्याग्रह आणि भारताची स्वातंत्र्य चळवळ केंद्रस्थानी असलेला व्ही. मधुसूधन राव यांनी दिग्दर्शित केलेला हा राजकीय चित्रपट आहे. .
हकीकत (हिंदी, 1964)- चेतन आनंद दिग्दर्शित आणि निर्मित युद्धावरील एक चित्रपट. या चित्रपटात धर्मेंद्र, बलराज साहनी, प्रिया राजवंश, सुधीर, संजय खान आणि विजय आनंद यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
सुभाष चंद्र (बंगाली, 1966) – भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान व्यक्तिमत्व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित पियुष बोस दिग्दर्शित बंगाली चित्रपट
शहीद ए-आझम भगतसिंग (पंजाबी, 1974)-ओम बेदी दिग्दर्शित शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट
22 जून 1897 (मराठी, 1979) – 1897 मध्ये पुण्यातील चापेकर बंधूंनी वॉल्टर चार्ल्स रँड आणि चार्ल्स एगर्टन आयर्स्ट या दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हत्येच्या सत्य घटनेवर आधारित पुरस्कारप्राप्त चित्रपट.
गांधी (इंग्रजी/हिंदी, 1982) – जगभरात प्रशंसा मिळवलेला एक चरित्रात्मक चित्रपट, रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित आणि महात्मा गांधीच्या भूमिकेत बेन किंग्स्ले . या चित्रपटाने 11 नामांकनांपैकी 8 अकादमी पुरस्कार (ऑस्कर) जिंकले
डॉ आंबेडकर (तेलुगू, 1992)- भारत पारेपल्ली दिग्दर्शित बाबासाहेब आंबेडकरांवरील एक चरित्रपट .
कालापानी (मल्याळम, 1996)- ऐतिहासिक चित्रपट ज्याचे सह -लेखन आणि दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले होते. 1915 चा काळ दाखवण्यात आलेला हा चित्रपट ब्रिटीश राजवटी दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांच्या सेल्युलर जेलमध्ये (किंवा काला पानी ) बंदिस्त भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील कार्यकर्त्यांच्या जीवनावर केंद्रित आहे.
लोकमान्य: एक युगपुरुष (मराठी, 2015)- एक समाजसुधारक आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य सेनानी बाळ गंगाधर टिळक यांची जीवनकथा – या चित्रपटात सुबोध भावे टिळकांच्या भूमिकेत आहेत.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंजाबमध्ये कॅप्टन आणि सिद्धूच्या भांडणात फसली काँग्रेस, पण कशी?

Next Post

या शहरातील आंतरराज्यीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; असा चालायचा वेश्याव्यवसाय

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

doctor
संमिश्र वार्ता

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

सप्टेंबर 7, 2025
Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1
महत्त्वाच्या बातम्या

आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार आता या नावाने दिला जाणार….मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

सप्टेंबर 7, 2025
WhatsApp Image 2025 09 06 at 6.39.57 PM 1024x682 1
महत्त्वाच्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप

सप्टेंबर 7, 2025
GANESH VISRJAN 4 1024x682 1
मुख्य बातमी

गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्र्यांचा गणरायाला निरोप… राज्यातील गणेशोत्सवाच्या मिरवणुका शांततेत

सप्टेंबर 7, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने जपून चालवावी, जाणून घ्या, रविवार, ७ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 7, 2025
accident 11
संमिश्र वार्ता

लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीपूर्वीच मुख्य प्रवेशद्वाराजवळ अपघात…दोन चिमुकल्यांना चिरडून वाहनचालक फरार

सप्टेंबर 6, 2025
daru 1
संमिश्र वार्ता

परराज्यातील विदेशी मद्य वाहतूकप्रकरणी मोठी कारवाई…१ कोटी ५६ लाखाचा मुद्देमाल जप्त

सप्टेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना वाहन खरेदीचा योग, शनिवार, ६ ऑगस्टचे राशिभविष्य

सप्टेंबर 6, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

या शहरातील आंतरराज्यीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; असा चालायचा वेश्याव्यवसाय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011