मुंबई (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – कोविड विषाणूचे पुढील रूप खूपच घातक ठरू शकते, असा इशारा भारतीय मूळ असलेल्या ब्रिटिश तज्ज्ञाने दिला आहे. कँब्रिज इन्स्टिट्यूट फॉर थॅरेप्युटिक इम्युनोलॉजी अँड इन्फेक्शिअस डिसिज (सीआयटीआयआयडी) मधील क्लिनिकल मायक्रोबायोलॉजीचे प्रा. रवींद्र गुप्ता सांगतात, ओमिक्रॉन कमी गंभीर असल्याची बातमी चांगली वाटत आहे. परंतु विषाणूच्या स्वरूपामध्ये होणार्या बदलातील ही चूक समजावी. नैसिर्गिकरित्या ही चूक दुरुस्त होण्यास सुरुवात होईल, तेव्हा कोविडचे नवे रूप अत्यंत घातक आणि भीतीदायक असू शकते.
रवींद्र गुप्ता यांनी ओमिक्रॉनवरील अभ्यासानंतर सांगितले की, ओमिक्रॉन ज्या पेशींना संक्रमित करत आहे, त्या आपल्या फुफ्फुसामध्ये खूपच कमी आढळतात. त्यामुळे तो जास्त घातक आणि गंभीर दिसून येत नाही. परंतु ओमिक्रॉनचा संसर्ग कोणत्याही प्रकारे सौम्य नाही.
काळानुरूप विषाणू सौम्य होत जातात असे मानले जाते. परंतु त्याचे दीर्घकालीन विकासवादी निकाल असतात. कोविडच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जैविक व्यवहारात विषाणू बदल करू शकत नाहीत. फक्त फुफ्फुसामध्ये कमी असलेल्या पेशींवर चुकून विषाणूने हल्ला केला आहे. ही बातमी चांगली वाटू शकते. परंतु विषाणूचे वेगवेगळे रूप धोकादायक असू शकतात. त्यापैकी कोणतेतरी एक रूप वेगाने पसरून नागरिकांना गंभीररित्या आजारी करेल, असा इशारा प्रा. गुप्ता यांनी दिला आहे.
लस घेणे अनिवार्य
या रूपाच्या संसर्गाला नैसर्गिक लशीप्रमाणे पाहणार्यांचा दृष्टीकोन समजणे आवश्यक आहे. परंतु संसर्गाचा प्रसार रोखण्याचे प्रयत्न सोडणे धोकादायक ठरू शकते. व्यापक लसीकरण करून घेणे हाच सध्या कोविड रोखण्याचा ठोस उपाय आहे, असा सल्ला त्यांनी ब्रिटिश सरकारला दिला आहे. आपल्यासमोर एक कथितरित्या गंभीर आजार पसरवणारे विषाणूचे रूप आहे. याचा फायदा घेऊन आपण जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.