विशेष प्रतिनिधी, मुंबई
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या पुढील आठ वर्षांचे कार्यक्रम निश्चित झाले आहेत. भविष्यातील दौऱ्यांमध्ये टी-ट्वेंटी विश्वचषक दोन वर्षांनी होणार आहेत. तसेच ५० षटकांचे म्हणजेच एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत २०२७ पासून १४ संघ सहभाग होणार आहेत. पुढील टप्प्यात जागतिक कसोटी चषकाचे चार सत्र आणि दोन चँपियन्स ट्रॉफी खेळले जाणार आहेत.
आयसीसीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्यानंतर ही माहिती देण्यात आली. आयसीसीने २०२४ ते २०३१ पर्यंतचे कार्यक्रम ठरविले आहेत. त्यामध्ये पुरुषांचा विश्वचषक आणि टी-ट्वेंटी विश्वचषक खेळला जाणार आहे. चँपियन्स ट्रॉफीचे पुन्हा आयोजन केले जाणार आहे. आयसीसी महिला क्रिकेटचा कार्यक्रम याआधीच ठरविण्यात आला आहे.
आयसीसीचे मोठे निर्णय
वनडे आणि टी-२० विश्वचषकाबाबत पुन्हा निर्णय घेण्यात आला. टी-ट्वेंटी विश्वचषकात आधी १६ संघ खेळत होते. आता वाढवून २० संघ खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकदिवसीय विश्वचषकात १० संघ खेळत होते, त्याला वाढवून १४ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टी-ट्वेंटी विश्वचषक २०२४, २०२६, २०२८ आणि २०३० मध्ये खेळले जाणार आहेत. एकदिवसीय विश्वचषकचे आयोजन २०२७ आणि २०३१ मध्ये होणार आहे. या दरम्यान चार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे अंतिम सामने खेळले जाणार आहेत. स्पर्धेचा पहिला अंतिम सामना १८ ते २२ जून रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे.
२०२४ ते २०३१ पर्यतचे कार्यक्रम
२०२४ – टी-ट्वेंटी विश्वचषक (२० संघ)
२०२५ – चँपियन्स ट्रॉफी (८ संघ)
२०२५ – वर्ल्ड टेस्ट चॅंपियनशिप अंतिम सामना
२०२६ – टी-२० विश्वचषक (२० संघ)
चँपियन्स ट्रॉफी पुन्हा सुरू
२०२७ – एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक (१४ संघ)
२०२७ – वर्ल्ड टेस्ट चॅंपियनशिप अंतिम सामना
२०२८ – टी-२० विश्वचषक (२० संघ)
२०२९ – चॅम्पियन्स ट्रॉफी (8 टीमें)
मोठ्या स्पर्धा
२०२९ – वर्ल्ड टेस्ट चॅंपियनशिप अंतिम सामना
२०३० – टी-२० विश्वचषक (२० संघ)
२०३१ – एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक (१४ संघ)
२०३१ – वर्ल्ड टेस्ट चॅंपियनशिप अंतिम सामना