मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मागील काही दिवसांपासून पावसाचा राज्यात लपंडाव सुरु आहे. मुसळधार पावसानंतर अचानक काही दिवस पाऊस विश्रांती घेत असल्याचे चित्र आहे. आता आज (दि. ६) पासून चार-पाच दिवस पुन्हा पाऊस सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने जनजीवन सुरळीत झाले होते. शिवाय रखडलेली शेतीकामेही मार्गी लागली होती. पण राज्यात पुन्हा पावसाला सुरवात होणार असल्याने चित्र बदलणार आहे. विशेषत: पुढील २४ तासांमध्ये म्हणजेच शनिवारी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पाच दिवस पावसामध्ये सातत्य राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. १० ते १२ दिवसानंतर पाऊस पुन्हा सक्रीय होत असल्याने शेतकऱ्यांची तर चिंता वाढली आहे. यंदा खरिपातील पेरणी होताच राज्यात मुसळधार पाऊस झाला होता शिवाय पावसामध्ये तब्बल एक महिना सातत्यही होते. त्यामुळे आता ही पिके बहरायला लागली होती. पण आता पाऊस झाला तर मात्र या पिकांचे नुकसान होऊ शकते.
Gradual increase in the rainfall activity expected over the region during next 5 days . येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा I तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3yVNq भेट द्या pic.twitter.com/yyLZiUFoeB
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 6, 2022
यापूर्वीच सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला असताना पुन्हा अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्यामुळे नदीपात्रालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय पाणीपातळीतही वाढ होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ऑगस्टमध्ये सर्वसाधारणच पाऊस राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला होता मात्र, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा धोका वाढला आहे. त्यामुळे पिकांचे तर नुकसान होणारच आहे पण नागरिकांना सतर्क रहावे असा सल्लाही देण्यात आला आहे. राज्यात पाच दिवस मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवतानाच हा पाऊस मुसळधार ते अतिमुसळधार असेल असे हवामान विभागाने म्हणले आहे. २४ तासांत दक्षिण कोकण,दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडेल.
?राज्यात जुलैमध्ये आधीच जास्त पाऊस झाला आहे आणि 5 दिवस मान्सून सक्रिय होण्याची शक्यता – IMD
?राज्यातील नद्या अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीच्या जवळ असू शकतात.
?त्यामुळे नद्यांच्या काठी राहणाऱ्या लोकांनी या कालावधीत पाण्याच्या पातळीत अचानक वाढ होण्यासाठी सतर्क राहावे.
Take Care— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 5, 2022
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे नदी, नाले ओढेच नाहीतर धरणांनीही सरासरी ओलांडली आहे. त्यामुळे अनेक धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता त्यामुळे नदीलगतच्या गावांमध्ये पाणी शिरल्याच्या अनेक घटना राज्यभरात घडल्या होत्या. आता पावसाने हजेरी लावली तर पुन्हा पाणीपातळीत वाढ होईल. परिणामी नद्या अनेक ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडू शकतात. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Next 5 Days Heavy Rainfall Prediction in Maharashtra
IMD Climate Forecast Weather Meteorology