मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील कॅम्प भागातील शिवशक्ती मित्र मंडळाने यंदा सप्तशृंगी गडावरील मूर्ती संवर्धनानंतर समोर आलेल्या आदिमायेच्या नव्या तेजोमय रूपातील प्रतिकृतीची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे कागदाच्या लगद्यापासून देवीची ही इको फ्रेंडली मूर्ती साकारण्यात आली आहे. सुमारे दहा फूट उंचीची आदिमायेच्या नव्या रुपातील ही प्रतिकृती मालेगाव शहरातील भाविकांचे आकर्षण ठरत आहे.