नाशिक – मला कोणी धमकी दिल्याने वृत्त गैरसमजातून प्रसिद्ध झाले असावे असा खुलासा विजय नर्सिंग होमचे डॅा. अतुल वडगावकर यांनी केला आहे. या खुलासामध्ये म्हटले आहे की, सध्या जागतिक स्तरावर कोरोनाचे संकट ओढावलेले आहे. हे संकट दूर व्हावे यासाठी सरकार, प्रशासन, पोलिस, डॅाक्टर्स, सफाई कर्मचारी यांसह सर्वच प्रयत्नशील आहेत. वाढलेल्या कोरोना संकटामुळे आरोग्य यंत्रणेवर देखील प्रचंड ताण पडला आहे. याकाळात देखील सर्व डॉक्टर्स, नर्सेस व आरोग्य सेवक असे आम्ही एकत्रित कोरोना विरुद्धचा हा लढा लढवत आहोत. यात रुग्णांना योग्य ते उपचार मिळावेत व त्यांचे जीव वाचावेत यासाठी माझ्यासह वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच झटत आहेत. मी व माझी पुर्ण टीम गेल्या १ वर्षांपासून कोरोना रुग्णांची सेवा करत आहोत. आज रोजी पर्यंत सुमारे १० हजार पेक्षा जास्त रुग्ण तपासले आहेत. माझ्याकडे येणारे रुग्ण व हितचिंतक यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाच्या जोरावर हे कार्य असेच अविरत पुढे चालु राहणार आहे. याकाळात मला व माझ्या टीमला सर्वांचे सहकार्य मिळत आहे. मला कोणी धमकी दिल्याने वृत्त गैरसमजातून प्रसिद्ध झाले असावे असे डॅा. वडगांवकर यांनी म्हटले आहे.