नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक जिल्हा विज्ञान अध्यापक संघ नाशिक व श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५० वे नाशिक जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित माध्यमिक विभागाचे एकूण ४८ प्रतिकृती सादर करण्यात आले होते. त्या मध्ये मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यू मराठा हायस्कूल ने लर्न विथ फन ही प्रतीकृती प्रयोगशाळेतील महागड्या साहित्या ऐवजी पर्यायी साहित्याचा वापर करत वैज्ञानिक संकल्पना त्यांनी मांडली. त्यातून त्या प्रतिकृतीची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्यासाठी प्रयोगशाळा सहाय्यक एकनाथ आहेर, विद्यार्थीनी सात्विका कदम, स्वरा जाधव, साक्षी अमृतकर, संस्कृती पाटिल, संस्कृती पिंगळे व विज्ञान विषय शिक्षक यांनी मेहनत घेतली त्यांना मार्गदर्शन मुख्याध्यापक छगन साळवे यांनी केले.या सर्वाचे मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे व कार्यकारी मंडळ व शालेय समिती यांनी विशेष कौतुक केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.