शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू

by India Darpan
नोव्हेंबर 19, 2024 | 11:22 am
in संमिश्र वार्ता
0
crime 13


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बेळगावः घटप्रभा नदीत मासेमारी करण्यासाठी गेलेल्या दोन मुलांसह वडिलांचा बुडून मृत्यू झाला. बेनकनहोळी (ता. हुक्केरी) गावात घडली. लक्ष्मण रामा अंबली (वय ४९), रमेश लक्ष्मण अंबली (वय १४) व यल्लाप्पा लक्ष्मण अंबली (वय १२) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे बेनकनहोळी गावावर शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर यमकनमर्डी पोलिस ठाण्याचे निरीक्षक जावेद मुशाफीर व सहकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दल तसेच एनडीआरएफ पथकाला या घटनेची माहिती दिली. दोन्ही पथकांकडून तातडीने शोधमोहीम सुरू केली. एनडीआरएफच्या पथकाने सुरू केलेल्या शोधमोहिमेला सायंकाळी सहा वाजता यश मिळाले. दोन्ही मुलांचे म्हणजे रमेश व यल्लाप्पा यांचे मृतदेह नदीपात्रात सापडले.

लक्ष्मण यांचा मृतदेह शोधण्याचे काम साडेसहा वाजेपर्यंत सुरू होते; पण अंधार पडल्यामुळे शोधमोहीम थांबविण्याचा निर्णय घेतला. आज पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटप्रभा नदीच्या काठावर व राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या बेनकनहोळी गावातील रहिवासी मासेमारी करतात. दररोज रात्री नदीपात्रातील पाण्यात जाऊन जाळे लावले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी जाळे काढले जाते. रविवारी रात्री लक्ष्मण आपली दोन मुले रमेश व यल्लाप्पा यांच्यासह मासेमारीचे जाळे लावण्यासाठी दुचाकीवरून नदीपात्राकडे गेले होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी परत आले नाहीत. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत होते. सोमवारी पहाटे लक्ष्मण यांच्या पत्नीने आपल्या नातेवाइकांशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली.

नातेवाइक आल्यानंतर त्यांनी नदीपात्राकडे जाऊन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या वेळी नदीच्या काठावर त्यांना दुचाकी व त्या तिघांची पादत्राणे आढळून आली. त्यामुळे लक्ष्मण यांची पत्नी व नातेवाइकांनी तातडीने यमकनमर्डी पोलिस ठाणे गाठले. लक्ष्मण तसेच रमेश व यल्लाप्पा रात्रीपासून घरी परत आले नसल्याची माहिती दिली. दुचाकी व त्यांची पादत्राणे नदीकाठावर असल्याचेही पोलिसांना सांगण्यात आले. त्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. निरीक्षक जावेद मुशाफिर यांनी तातडीने अग्निशमन दल व एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले. पथक पोहोचताच तातडीने शोधमोहीम सुरू केली. या घटनेची नोंद यमकनमर्डी पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आसियान इंडियन म्युझिक फेस्टिवलचे आयोजन…शान, रघू दीक्षित, सुकृती-प्रकृती आणि जसलीन रॉयल सादर करणार आपली कला

Next Post

शरद पवार गटाच्या माजी आमदाराला अपहरणाची धमकी

Next Post
crime114

शरद पवार गटाच्या माजी आमदाराला अपहरणाची धमकी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011