मुंबई – विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनात अमुलाग्र बदल झाला आहे. मानवी जीवनशैली बदलाला मोठी चालनाही त्यामुळे मिळाली आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वाहने वापरली जातात. चाकाच्या शोधामुळे हे शक्य झाले. दिवसागणिक नवनवीन तंत्रज्ञानामुळे अत्याधुनिक स्वरुपाची वाहने ग्राहकांसाठी उपलब्ध होत आहेत. आताही असे नवे तंत्रज्ञान येत आहे. ज्याद्वारे वाहनांमध्ये अमुलाग्र बदल होणार आहे. रस्त्यात आलेला अचानक अडथळा लक्षात घेऊन वाहन काही सेकंदातच थांबू शकेल, असे हे तंत्रज्ञान आहे. कारचा वेग कितीही असला तरी समोरील अडथळा लक्षात घेता वाहन तत्काळ थांबणार आहे. रस्ते अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हे फिचर अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, बघा, या नव्या तंत्रज्ञानाचा व्हिडिओ
https://twitter.com/GlobalNCAP/status/1458759080118521867