मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्हाला जर करोडपती व्हायचे असेल तर आता एक नामी संधी चालू आली आहे. करदात्यांमध्ये वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीबाबत जागरुकता निर्माण व्हावी, या उद्देशाने रिवार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत जीएसटी बिल अपडेट करणाऱ्यांना लाखोंची बक्षिसे जिंकता येणार आहे. वस्तू आणि सेवा करावर, सरकारला बनावट बिलं आणि बनावट नोंदणींबाबत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जीएसटी अधिकाऱ्यांनीही गेल्या काही महिन्यांत याविरोधात मोहीम सुरू केली आहे.
आता बनावट बिलांना आळा घालण्यासाठी आणि ग्राहकांना जागरूक करण्यासाठी, सरकार एक नवीन रिवॉर्ड योजना आणत आहे, ज्या अंतर्गत तुम्ही एकाच बिलाद्वारे लाखोंची बक्षिसे जिंकू शकता. सरकार १ सप्टेंबरपासून सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘मेरा बिल मेरा अधिकार’ प्रोत्साहन योजना सुरू करणार आहे. याच्या मोबाइल अॅपवर बिल ‘अपलोड’ करून, लोक १०,००० रुपयांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतची रोख बक्षिसं जिंकण्याची संधी मिळणार आहे. या योजनेचा उद्देश लोकांना प्रत्येक वेळी खरेदी करताना बिले मागण्यास प्रवृत्त करणे हा असल्याची माहिती, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने सांगितले. ही योजना सध्या आसाम, गुजरात आणि हरियाणा, पुडुचेरी, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेलीमध्ये सुरू केली जाणार आहे. सीबीआयसीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) यावर ही माहिती दिली. आपले जीएसटी असलेले बिल अपलोड केल्यानंतर लोकांना रोख रक्कम मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले आहे.
बिलाचे मूल्य एवढे हवे
‘मेरा बिल मेरा अधिकार’ हे अॅप आयोएस आणि अॅण्ड्रॉइड या दोन्हीवर उपलब्ध असणार आहे. यावर अपलोड करण्यात आलेल्या इनव्हॉइसमध्ये विक्रेत्याचा जीएसटीआयएन, इनव्हॉइस नंबर, भरलेली रक्कम आणि टॅक्सची माहिती असणे अनिवार्य आहे. बिलाचे किमान मूल्य २०० रुपये असणे अनिवार्य आहे.
Now fake bills will be fined, GST department will give reward
New Scheme 1 Crore Win Chances 1 September 2023