नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एप्रिल महिना आज संपणार असून उद्यापासून मे महिना सुरू होणार आहे. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीपासून काही ना काही नियम बदलतात. हे बदल थेट तुमच्या खिशावर परिणाम करतात. अशा परिस्थितीत, हे नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे, अन्यथा तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जाणून घेऊया या बदलांबद्दल…
जीएसटी नियम
मे महिन्याच्या सुरुवातीपासून व्यावसायिकांसाठी जीएसटीमध्ये मोठा बदल होणार आहे. नवीन नियमानुसार, 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांना 7 दिवसांच्या आत इनव्हॉइस नोंदणी पोर्टलवर (IRP) व्यवहाराची पावती अपलोड करणे बंधनकारक आहे. सध्या इनव्हॉइस तयार करण्याच्या आणि अपलोड करण्याच्या तारखेसाठी अशी कोणतीही मर्यादा नाही.
म्युच्युअल फंड
म्युच्युअल फंड कंपन्यांना बाजार नियामक सेबीने हे सुनिश्चित करण्यास सांगितले आहे की गुंतवणूकदार केवळ केवायसीसह ई-वॉलेटद्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करतात. याची अंमलबजावणी १ मेपासून होणार आहे. यानंतर गुंतवणूकदार केवळ केवायसीसह ई-वॉलेटद्वारे गुंतवणूक करू शकतात.
पंजाब नॅशनल बँक
तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर हा बदल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या बँक खात्यात पैसे नसल्यास आणि तुम्ही एटीएममधून पैसे काढले आणि व्यवहार अयशस्वी झाल्यास. त्यामुळे बँकेकडून 10 रुपये + GST आकारला जातो.
एलपीजी, सीएनजी आणि पीएनजी
सरकार दर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी, सीएनसी-पीएनजीच्या नवीन किमती जाहीर करते. गेल्या महिन्यात सरकारने 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 91.50 रुपयांनी कमी केली होती. यानंतर दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर 2,028 रुपयांवर आला. मात्र, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सीएनजी-पीएनजीच्या दरातही बदल होऊ शकतो.
New Rules from 1 May 2023 Big Changes