नवी दिल्ली – दुचाकीवरुन तुम्ही लहान मुलांना घेऊन जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण, सुरक्षेच्या दृष्टीने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने आता यासाठी नवे नियम लागू केले आहेत. त्याची अंमलबजावणीही होणार आहे.
मोटार वाहन कायद्याच्या कलम 129 मध्ये मोटार वाहन (सुधारणा) कायदा 2019, दिनांक 09.08.2019 द्वारे दुरुस्ती करण्यात आली आहे. या कलमातील दुसरी तरतूद आहे -“चार वर्षांखालील मुलांनी मोटार सायकलवरून प्रवास करणे किंवा त्यांना मोटार सायकलवरून नेणे यासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार नियम जारी करून त्याद्वारे उपाययोजना करू शकेल.”
यानुसार मंत्रालयाने 21 ऑक्टोबर 2021 रोजी जीएसआर 758(E) द्वारे यासंदर्भातील मसुदा नियम तयार केले असून त्यात पुढील शिफारसी समाविष्ट आहेत –
- चार वर्षांखालील मुलांसाठी, मोटारसायकल चालकाबरोबर मुलाला बांधण्यासाठी सुरक्षा उपकरणांचा वापर करावा.
- भारतीय मानक विभाग कायदा 2016 अंतर्गत विहित केलेले हेल्मेट उपलब्ध होईपर्यंत 9 महिने ते 4 वर्षे वयाच्या लहान बालकाने त्याच्या डोक्यावर स्वतःचे हेल्मेट घातले आहे जे त्याच्या डोक्याला बरोबर बसेल आणि ते सायकल हेल्मेट [ASTM 1447]/ [European (CEN)BS EN 1080/ BS EN 1078] चे मानकांचे पालन करणारे असेल याची मोटारसायकल चालकाने खातरजमा करावी.
- 4 वर्षापर्यंतच्या मुलासह प्रवास करणाऱ्या मोटारसायकलचा वेग तशी 40 किमी पेक्षा जास्त नसावा.