मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ३१ मार्च ही आर्थिक वर्षातील सर्वांत महत्त्वाची तारीख आहे. या तारखेपूर्वी करण्याची कामे वेळेत झाली नाही तर आर्थिक गणितं बिघडू शकतात. आणि मोठं नुकसानही सहन करावं लागू शकतं. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करणाऱ्यांसाठीही ही तारीख अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करणाऱ्यांनी किंवा शेअर्सचे ट्रेडिंग करणाऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी महत्त्वाची कामं पूर्ण केली नाहीत तर त्यांची खाती फ्रीज होऊन शेअर्सची खरेदी करण्यावरही बंधनं येऊ शकतात. बहुधा शेअर्सची खरेदीही करता येणार नाही. सेबीने डिमॅट खाती असलेल्यांना आणि ट्रेडिंग करणाऱ्यांना नॉमिनी घोषित करणे अनिवार्य केले आहे. ३१ मार्चपर्यंत नॉमिनीचे नाव जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही हे काम केले नसेल तर तातडीने करून घ्या. कारण तसे केले नाही तर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करता येणार नाही आणि शेअर्सची खरेदी-विक्रीही करता येणार नाही. खरे तर गेल्यावर्षी ३१ मार्चपर्यंतच मुदत देण्यात आली होती. मात्र नंतर मुदत वाढविण्यात आली.
नवीन खातेधारकांसाठी
ज्या गुंतवणुकदारांनी नवीन ट्रेडिंग आणि डीमॅट खाती तयार केली आहेत, त्यांना डिक्लेरेशन फॉर्मद्वारे नॉमिनी द्यावे लागेल. या फॉर्मवर खातेधारकाची स्वाक्षरी असेल. नॉमिनी दाखल करताना मात्र साक्षीदाराची आवश्यकता नाही. त्यासाठी अॉनलाईन नॉमिनीही दाखल करता येतो.
नॉमिनी जोडण्यासाठी हे करा
नॉमिनी जोडण्यासाठी डिमॅट खातेधारकांनी किंवा शेअर्समध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांनी डिमॅट खात्यात लॉगइन करावे. त्यावर माय नॉमिनी पेजवर जा. तिथे अॅड नॉमिनी किंवा अॉप्ट-आऊट पर्याय निवडा. आता नॉमिनीचे डिटेल्स टाका आणि आयडीप्रूफ अपलोड करा.
New Rule 1 April 2023 Share Sale Purchasing BSE Trading