नवी दिल्ली – गेल्या २४ तासात २०.६६ लाखापेक्षा जास्त चाचण्या करुन भारताने एका दिवसात सर्वाधिक चाचण्या करण्याचा नवा विक्रम पुन्हा एकदा रचला आहे. सलग चार दिवस दररोज २० लाखांपेक्षा जास्त चाचण्याही करण्यात आल्या आहेत. भारताने एका दिवसात सर्वाधिक चाचण्या करण्याचा नवा विक्रम पुन्हा एकदा रचला आहे.
– देशात दैनंदिन पॉझीटीव्हिटी दरात १२.४५ टक्के पर्यंत घट झाली आहे.
– देशात गेल्या २४ तासात एकूण, २०,६६6,२८५ चाचण्या करण्यात आल्या.
– देशात सलग ९ व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. गेल्या २४ तासात ३,५७,६३० कोरोनामुक्तांची नोंद झाली आहे.
– बरे झालेल्यांची एकूण संख्या आज २,३०,७०,३६५ झाली. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर वाढून ८७.७६ झाला आहे.
– नुकत्याच बरे झालेल्यांपैकी ७३.४६ टक्के जण दहा राज्यातले आहेत.
– देशात सलग सहाव्या दिवशी ३ लाखांपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत ही आणखी एक सकारात्मक घडामोड आहे.
– गेल्या २४ तासात २,५७,२९९ नव्या रुग्णांची नोंद झाली.
– गेल्या २४ तासात आढळलेल्या नव्या रुग्णांपैकी ७८.१२ टक्के रुग्ण दहा राज्यातले आहेत. तामिळनाडूत सर्वाधिक ३६,१८४, त्या पाठोपाठ कर्नाटकात ३२,२१८ नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.
– दरम्यान, भारतातील एकूण सक्रीय रुग्णसंख्येत घट होत ती आज २९,२३3,४०० वर पोहचली.
– गेल्या २४ तासात एकूण घट १,०४,५२५ इतकी नोंदवण्यात आली.
– देशातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी ही संख्या ११.१२ टक्के आहे.
– देशातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी ६९.९४ टक्के रुग्ण आठ राज्यातील आहेत.
– देशव्यापी लसीकरण मोहीमेच्या तिसऱ्या टप्प्यात कोविड लसीच्या एकूण १९.३३ कोटी मात्रा आतापर्यंत देण्यात आल्या आहेत.
हाती आलेल्या अहवालानुसार आज सकाळी सात वाजेपर्यंत, एकूण १९,३३,७२,८१९ लसीच्या मात्रा २७,७६,९३६ सत्रांमध्ये देण्यात आल्या. देशभरात आतापर्यंत झालेल्या एकूण लसीकरणापैकी ६६.३० टक्के मात्रा दहा राज्यात दिल्या आहेत.