नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नंदुरबार जिल्ह्यातील सध्याची रास्त भाव दुकाने कायम ठेवून आतापर्यंत रद्द असलेली, राजीनामा दिलेली, नवीन प्रस्तावित व इतर कारणांमुळे रिक्त असलेल्या 44 नवीन रास्त भाव दुकान मंजुरीसाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत, असे जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
तालुकानिहाय रास्त भाव दुकानांची माहिती अशी (अनुक्रमे गावाचे नाव व दुकान क्रमांक या क्रमाने) : नंदुरबार शहर व तालुका : नंदुरबार शहर-1, नंदुरबार शहर-2 , नंदुरबार शहर-3,नंदुरबार शहर-4, नंदुरबार शहर-5, बामडोद, ओझर्दे, लोय, पिंपरीपाडा (भिलाईपाडा), गुजर जांभोली (बद्रीझिरा).
नवापूर तालुका : चिमणीपाडा,विसरवाडी, नवापूर शहर, घोगळपाडा (मावचीफळी), धनराट (मोरथुवा). शहादा तालुका : कमखेडा,शिरुड तह, दोंदवाडे, लिंबर्डी (केवडीपाणी). अक्कलकुवा तालुका : चिमलखेडी (कामगारपाडा ), मनिबेली (धनखेडी), वडली, जुना नागरमुठा, मोरही, भोयरा, खापरान, गलोठा बु, रेथी, पिमटी, सिंगपुर खु, ओहवा-एक, खाई, ब्रिटिश अंकुशविहीर, अलिविहीर.
अक्राणी तालुका : कात्री (शेलखीपाडा,गुडापाडा ),शेलकुई (कारभारीपाडा ),गेंदा (वरचापाडा ), काकारपाटी (जुना पाटीलपाडा ),अट्टी (बाहरीपाडा ),खडक्या (जोमख्यापाडा ),गोरंबा (पठालीपाडा), मांडवी (रुणमालपाडा ),घाटली (हाकडीकेली), चिंचकाठी. अशा नंदुरबार तालुक्यातील दहा, नवापूर पाच, शहादा चार, अक्कलकुवा पंधरा आणि अक्रांणी दहा अशा 44 नवीन रास्त भाव दुकानांची मंजूरीकरीता रास्त भाव दुकान इच्छुक असलेल्यांकडून 1 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.
अधिक माहिती अटी व शती,नियम सविस्तर जाहीरनाम्याची प्रत संबंधित तहसिल कार्यालय, जिल्हा पुरवठा कार्यालय, नंदुरबार येथे प्रसिद्ध करण्यात आली असून विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ https://nandurbar.gov.in यावर देखील जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे
New Ration Shop Permission Applications invited