विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यातील पोलिस दलात असलेल्या हवालदार यांच्यासाठी मोठी खुषखबर आहे. आपणही कधी तरी फौजदार (पीएसआय) व्हावं अशी असंख्य हवालदारांची इच्छा आहे. मात्र, सद्यस्थितीत त्यांना ही संधी मिळत नाही. पदोन्नती मिळाली तरी ते तिथपर्यंत पोहच नाहीत. अखेर राज्याच्या गृहविभागाने हवालदारांच्या हिताचा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार हवालदारांना थेट आता फौजदार अर्थात सहायक पोलिस निरीक्षक (पीएसआय) या पदापर्यंत पोहचता येणार आहे. या सर्वांसाठी त्यांच्या आयुष्यातील ही सर्वात महत्त्वाची व मोठी भेट ठरणार आहे. सेवानिवृत्तीवेळी हे हवालदार फौजदार झालेले असणार आहेत. त्यामुळे ही बाब पोलिस दलासाठीही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे, यासाठी गृहविभागातर्फे प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनानंतर याबाबत मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

— HMO Maharashtra (@maharashtra_hmo) July 3, 2021