नवी मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दक्षिण कोरियाच्या महिला युट्यूबरचा विनयभंगाची घटना दोन दिवसांपूर्वीच घडलेली असतानाच आता पुन्हा मुंबईतील खार भागातून आणखी एक अशीच घटना समोर आली आहे. एका महिलेने झेप्टो नावाच्या वेबसाईटवरून ऑर्डर केली होती. ही ऑर्डर देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयने संबंधित महिलेचा विनयभंग केला. सुरक्षा रक्षकाने मदत केल्याने बचावल्याचे पीडित महिलेने सांगितले आहे. याविषयी महिलेने ट्विटरवरुन माहिती दिली आहे.
महिलेने म्हणल्यानुसार, “मी ३० नोव्हेंबर रोजी झेप्टो येथून घरगुती सामानाची ऑर्डर दिली होती. दुपारी तीन वाजून १० मिनिटांनी डिलिव्हरी बॉय शाहजाद शेख ऑर्डर देण्यासाठी आला. मी गुगल पेवरून पेमेंट करत होते. तेव्हा तो लपून माझा व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. मला त्याचा संशय आल्यावर मी याबाबत विचारलं. तेव्हा तो उडवाउडवीचे उत्तर द्यायला लागला. अखेर मी त्याला त्याचा मोबाईल मला दाखवायला सांगितला. १५ मिनिटे त्याने मोबाईल दाखवला नाही. अखेर मी त्याला मोबाईल दाखव अथवा सुरक्षा रक्षकाला बोलावेन असं सांगितलं.” मी सुरक्षा रक्षकाला बोलावण्याविषयी बोलल्यावर तो माझ्या परवानगीशिवाय माझ्या घरात आला आणि माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा मी घरात एकटीच होते. त्याने माझे हात पकडले आणि माझ्याशी गैरवर्तन करू लागला. मला खूप मोठा धक्का बसला आणि मी किचनमध्ये पळाले. किचनच्या खिडकीतून मी सुरक्षा रक्षकाला हाक मारली,” अशी माहिती पीडितेने दिली आहे.
https://twitter.com/sabeenasyed8/status/1598345529439944704?s=20&t=FODumrMnMSF8J0a4FItX6Q
“सुरक्षा रक्षकामुळे वाचले..”
मला माझ्या घरातही सुरक्षित वाटू नये का, असा प्रश्न महिलेने ट्विटरवरुन विचारला आहे. तसेच सुरक्षा रक्षकामुळे वाचले असून तो नसता तर काय, अशी भीतीदेखील त्यांनी व्यक्त केली आहे.
झेप्टोचं म्हणणं काय?
संबंधित ट्विटमध्ये महिलेने ट्विटरवर झेप्टोला आणि मुंबई पोलिसांना टॅग करत तक्रार केली आहे. त्यावर झेप्टोने झालेल्या प्रकाराबद्दल प्रतिसाद दिला आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीत स्थानिक पोलिसांना सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तक्रारीत तथ्य आढळल्यास आरोपीवर कठोर कारवाई करु असे आश्वासनदेखील दिले आहे.
https://twitter.com/sabeenasyed8/status/1598598602620014593?s=20&t=3bZ_gkMXdARtWGvGd6taRQ
New Mumbai Food Delivery boy Girl Molestation Crime