मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस आल्याचे दिसत आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर या कलाकारांमुळे तिला विशेष पसंती मिळत आहे. या कलाकारांमुळे मालिकेला चार चांद लागले आहेत. या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही नेहा कामत ही भूमिका साकारत आहे. या मालिकेद्वारे ती घराघरात पोहोचली आहे. प्रार्थना बेहरेच्या घरी एक नवा पाहुणा आला आहे. तिने त्याचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
प्रार्थना बेहेरे ही एक मराठी अभिनेत्री असून ती सध्या मराठी आणि हिंदी चित्रपटात व मालिकेत काम करते. प्रार्थनाची पहिली मालिका एकता कपूर निर्मित पवित्र रिश्ता आहे. सध्या ती माझी तुझी रेशीमगाठी या मालिकेत काम करत आहे. त्यातच प्रार्थनाने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती एका सोफ्यावर बसून कुत्र्यासोबत खेळताना दिसत आहे. भेटा माझ्या घरातील नव्या पाहुण्याला…, असे तिने या व्हिडीओला कॅप्शन देताना म्हटले आहे.
विशेष म्हणजे मूव्ही असे तिच्या घरातील छोट्याशा पाहुण्याचे नाव आहे. तिचा हा छोटा पाहुणा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा पाळीव कुत्रा आहे. तिने याचा एक छान व्हिडीओदेखील शेअर केला आहे. विशेष म्हणजे प्रार्थनाला पाळीवर प्राण्यांबद्दल खूपच प्रेम आहे.
त्याचप्रमाणे तिच्याकडे गब्बर नावाचा एक कुत्रा आहे. तसेच फिल्मी नावाचं एक छोटंसं पिल्लू देखील तिच्या घरी आहे. ती अनेकदा त्यांच्यासोबतचे फोटो व्हिडीओ शेअर करताना दिसते.
दरम्यान, सध्या प्रार्थना ही माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत झळकताना दिसत आहे. या मालिकेत तिने नेहा हे पात्र साकारलं आहे. सध्या या मालिकेत नवनवीन ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या मालिकेचा चाहता वर्गही फार मोठा आहे.
New Guest Come at Actress Prarthana Beheres home see Video