विशेष प्रतिनिधी, मुंबई
युजर्सना चांगल्या सुविधा देण्यासाठी गुगलकडून वेळोवेळी नवे फिचर लाँच केले जातात. त्याचपद्धतीने गुगलकडून एक नवे फिचर कार्यान्वित करण्यात येणार आहे. युजर आपल्या अकाउंटमधून ई-मेलमधील फोटो थेट Google Photo मध्ये सेव्ह करू शकणार आहेत.
गुगलच्या या नव्या अपडेटला सेव्ह टू फोटो बटन च्या नावाने ओळखले जाईल. सध्या Gmail चे नवे सेव्ह टू फोटो फिचर फक्त JPEF फॉर्मेटमध्ये उपलब्ध असेल. Gmail युजर्स, गुगल वर्कप्लेस, G Suite बेसिक, G Suite बिजनेस ग्राहकांसाठी येत्या काही आठवड्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नव्या फिचरला सध्याच्या Add to Drive बटनमध्ये ठेवले जाईल. जिथे ई-मेलच्या फोटोला प्री-व्ह्यूच्या स्वरूपात अॅटेच किले जाते.
१५ दिवसांत कार्यान्वित
Gmail च्या नव्या अपडेटनंतर जेव्हा तुम्ही Gmail मेसेजमध्ये एक फोटो अॅटॅचमेंट पहाल तेव्हा तुम्ही तो फोटो थेट Google photo वर सेव्ह करू शकणार आहात. Gmail च्या सेव्ह टू फोटो या बटणाद्वारे तुम्ही ही क्रिया करू शकणार आहात.
Gmail मधून फोटो डाउनलोड करून मॅन्युअल पद्धतीने फोटो Google Photo बॅकअप घेण्याची सुविधा नव्या फिचरमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. डिफॉल्डच्या स्वरूपात हे फिचर ऑन होणार आहे. या पद्धतीने युजर्स सेव्ह फोटोचा पर्याय निवडू शकतील. नव्या फिचरला हळूहळू पुढील १५ दिवसात कार्यान्वित केले जाणार आहे.
१ जूनपासून नवा नियम लागू
१ जूनपासून नव्या हाय क्वालिटी फोटो आणि व्हिडिओच्या बॅकअपला डिफॉल्ट स्वरूपात अकाउंटमध्ये मिळणाऱ्या १५ फ्री स्पेसमध्ये मोजले जाईल. त्यापेक्षा अधिक स्टोरेजसाठी तुम्हाला Google one चे पेड सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल. तुमच्या हाय क्वालिटी फोटो आणि व्हिडिओवर नव्या बदलांचा परिणाम होणार नाही. जवळपास ८० टक्के युजर्स तीन वर्षांपर्यंत १५ जीबी स्टोरेजमध्ये आपले हाय क्वालिटी फोटो आणि व्हिडिओला स्टोअर करू शकणार आहेत. तुमचे १५ जीबी फ्री संपणार असेल तेव्हा तुम्हाला गुगलकडून एक नोटिफिकेशन पाठविले जाईल.