विशेष प्रतिनिधी, पुणे
इन्स्टंट मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी एक विशेष फिचर आणले आहे. त्याचे व्हेवफॉर्म (Waveform) असे नाव आहे. या फिचरच्या माध्यमातून व्हॉइस मेसेज पाठवण्यापूर्वी तो ऐकण्याचा पर्याय युजर्सना उपलब्ध होणार आहे. चुकीचे मेसेज पाठवण्यापासून रोखणे हाच या फिचरचा उद्देश आहे. युजर्सना हे फिचर खूपच उपयोगाचे ठरेल असा कंपनीला विश्वास आहे. या फिचरबद्दल आणखी माहिती जाणून घेऊयात.
वेब बिटा इन्फोने याबद्दल एक वृत्त दिले आहे. त्यानुसार, व्हॉट्सअॅपचे नवे फिचर व्हेवफॉर्म लवकरच लाँच होणार आहे. या फिचरची टेस्टिंग केली जात आहे. फिचर अॅक्टिव्ह होताच युजर्सना व्हॉइस मेसेज पाठवण्यापूर्वी रेकॉर्डिंग बंद करण्यासह ते ऐकण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
व्हॉइस मेसेज पाठवावा की पुन्हा रेकॉर्ड करावा हे या फिचरच्या माध्यमातून युजर्सना ठरवता येणार आहे. सध्या कंपनीतर्फे या फिचरबद्दल कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. आगामी काळात स्टेबल युजर्ससाठी हे फिचर वापरण्यासाठी सादर करण्यात येणार आहे.
व्हॉट्सअॅपने २०२१ मध्ये म्यूट व्हिडिओ नावाचे एक फिचर लाँच केले होते. व्हिडिओ पाठवण्यापूर्वी त्याचा आवाज बंद करू शकतो, हे या फिचरचे वैशिष्ट्य आहे. म्हणजेच दुसर्या युजरला व्हिडिओ मिळाला तर त्यामध्ये कोणताच आवाज नसेल.
म्यूट व्हिडिओ फिचर
तुम्ही ज्यांना आवाज नसलेला व्हिडिओ पाठवू इच्छितात, सर्वात प्रथम त्याच्या व्हॉट्सअॅप अकाउंटवर जावे. तिथे मेसेज बॉक्सवर क्लिक करून गॅलरीत जावे. त्यातून व्हिडिओ सलेक्ट करावा. जसे तुम्ही व्हिडिओवर क्लिक कराल तर तुम्हाला डाव्या बाजूला वर स्पिकरचा आयकॉन दिसेल. त्यावर टॅप करताच व्हिडिओचा आवाज बंद होईल.