बुधवार, ऑगस्ट 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

गुन्हेगाराला वेगाने पकडण्यासाठी नवीन ई-झिरो एफआयआर उपक्रम सुरू…

by Gautam Sancheti
मे 20, 2025 | 6:55 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
amit shah11


नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे की, गृह मंत्रालयाच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने (आय4सी) कोणत्याही गुन्हेगाराला अभूतपूर्व वेगाने पकडण्यासाठी नवीन ई-झिरो एफआयआर उपक्रम सुरू केला आहे. ‘एक्स’ वरील त्यांच्या पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले की, दिल्लीसाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आलेली ही नवीन प्रणाली एनसीआरपी किंवा 1930 अंतर्गत दाखल केलेल्या, सुरुवातीला 10 लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा अधिक असणाऱ्या , सायबर आर्थिक गुन्ह्यांचे स्वयंचलितपणे एफआयआरमध्ये रूपांतर करेल. सायबर गुन्हेगारांवर जलद कारवाई करणाऱ्या तपासांना चालना देणाऱ्या या नवीन प्रणालीचा लवकरच संपूर्ण देशभर विस्तार केला जाईल. सायबर-सुरक्षित भारत तयार करण्यासाठी मोदी सरकार सायबर सुरक्षा जाळे बळकट करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सायबर – सुरक्षित भारत’ हे स्वप्न साकार करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. अमित शाह यांनी भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या (आय4सी) अलिकडेच झालेल्या आढावा बैठकीत, सायबर आर्थिक गुन्ह्यांमधल्या पिडीताना, गमावलेले पैसे परत मिळवण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सूचना दिल्या होत्या.

नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (एनसीआरपी) आणि राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन 1930 मुळे सायबर आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित तक्रारींचा अहवाल आणि त्यावर त्वरित कारवाई करणे सोपे झाले आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या प्रक्रियेमध्ये आय4सी ची एनसीआरपी प्रणाली, दिल्ली पोलिसांची ई-एफ आय आर प्रणाली आणि नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) चे क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम्स (सीसीटीएनएस) यांचे एकत्रीकरण समाविष्ट आहे.

आता एनसीआरपी आणि 1930 मध्ये ₹10 लाखांपेक्षा जास्त आर्थिक नुकसानीशी संबंधित तक्रारी केल्यास दिल्लीच्या ई-क्राइम पोलिस स्टेशनमध्ये आपोआप झिरो एफआयआर नोंदवला जाईल. हा एफआयआर ताबडतोब प्रादेशिक सायबर गुन्हे पोलिस स्टेशनकडे पाठवला जाईल. तक्रारदार 3 दिवसांच्या आत सायबर गुन्हे पोलिस स्टेशनला भेट देऊ शकतात आणि झिरो एफआयआरला नियमित एफआयआरमध्ये रूपांतरित करू शकतात.

दिल्ली पोलिस आणि गृह मंत्रालयाचे भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र (आय4सी) यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) च्या कलम 173 (1) आणि 1(ii) च्या नवीन तरतुदींनुसार प्रकरणे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी एकत्र काम केले आहे. प्रादेशिक अधिकार क्षेत्राला बाजूला ठेवून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एफआयआर जारी करण्याची ही प्रक्रिया (ई-झिरो एफआयआर) सुरुवातीला दिल्लीमध्ये पथदर्शी म्हणून सुरू होईल. त्यानंतर ती इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विस्तारित केली जाईल.

या उपक्रमामुळे एनसीआरपी/1930 तक्रारींचे एफआयआरमध्ये सुलभपणे रूपांतर होऊ शकेल, ज्यामुळे पीडितांनी गमावलेले पैसे सहज परत मिळतील आणि सायबर गुन्हेगारांवरील दंडात्मक कारवाईचा मार्ग मोकळा होईल. अलीकडेच लागू केलेल्या नवीन फौजदारी कायद्यांतील तरतुदींमुळे हा फायदा होईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अखेर छगन भुजबळांनी घेतली मंत्रीपदाची शपथ…नाशिकच्या पालकमंत्रीपदावर वर्णी लागण्याची चर्चा

Next Post

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी मोक्याच्या लष्करी तळांना दिली भेट…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 38

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी मोक्याच्या लष्करी तळांना दिली भेट…

ताज्या बातम्या

IMG 20250820 WA0386

नाशिक जिल्हा परिषद पंचायत विकास निर्देशांकात राज्यात अव्वल…यांच्या हस्ते होणार गौरव

ऑगस्ट 20, 2025
election 1

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या…सहकार विभागाने घेतला हा निर्णय

ऑगस्ट 20, 2025
fda1

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई…मिठाईचा २४ हजाराचा साठा जप्त

ऑगस्ट 20, 2025
प्रातिनिधिक फोटो

कारमधून आलेल्या नागासाधूने संमोहन करुन व्यावसायीकास लुटले, रोकडसह हातातील सोन्याची अंगठी केली लंपास

ऑगस्ट 20, 2025
Sale KV Static blue 1x1 copy 1 e1755691438850

फ्लिपकार्टवर पोको एम७ प्‍लस ५जीच्‍या विक्रीला सुरूवात…ही आहे किंमत

ऑगस्ट 20, 2025
mahavitarn

सार्वजनिक गणेश मंडळांनी तात्पुरती नवीन वीज जोडणी घ्यावी….मुख्य अभियंतांनी दिले हे निर्देश

ऑगस्ट 20, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011