नवी दिल्ली – आरोग्य विभागाच्या परिचारिका क्षेत्रातील प्रतिष्ठित अशा “राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल ” हा पुरस्कार या परिचारिका क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या परिचारिकांना देण्यात येतो. यंदाही हा पुरस्कार देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत देशभरातील परिचारिका क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या परिचारिकांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मनसुखभाई मांडवीय हेही उपस्थित होते. हा पुरस्कार सोहळा कोरोना संक्रमणाच्या धर्तीवर व्हर्चुअल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घेण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन नॅशनल इन्फॉर्मेट्रिक्स सेंटर सर्व्हिसेस इन कॉर्पोरेट (NICSI) च्या माध्यमातून करण्यात आले होते.
या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. डॉ.भारती पवार यांनी या कार्यक्रमाच्या आभार मानतांना सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या कुशल नेतृत्वाखाली परिचारिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज भारतात सुमारे ७६ करोड लसीकरणाचा टप्पा ओलांडला असून हा एक जागतिक विक्रम आहे. आपल्या जीवाची पर्वा तसेच परिवाराची काळजी न करता भरपूर परिश्रम आणि जोखीम घेऊन काम केले आहे तसेच कोवीड-19 महामारीच्या संकट काळात रुग्ण व त्यांच्या परिवाराची त्यांनी केलेली देखभाल ही खरोखरच प्रशंसनीय अशीच होती. भविष्यातील तरुण पिढी नर्सिंग क्षेत्रात येऊन या पेशाला आपल्या अभ्यासाने समर्पित भावनेने सर्वोचता प्राप्त करण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील असतील व आपल्या सेवाकार्यातून एका नवीन उंचीवर नेऊन ठेवतील” असे प्रतिपादन केले. यावेळी उपस्थित राष्ट्रपती, मंत्रीमहोदय, सर्व अधिकारीवर्ग, पुरस्कार्थी याचे डॅा.पवार यांनी आभार मानले.