नवी दिल्ली – कोरोना विषाणूची दुसऱ्या लाटेने देशभरात गोंधळाचे वातावरण आहे. दुसऱ्या लाटेतील स्ट्रेन गेल्या लाटेपेक्षा धोकादायक असून, सर्व वयोगटातील लोकांवर हा सारखाच परिणामकारक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर हा विषाणू निदर्शनास येत नसल्याचे निष्पन्न होत आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये लक्षणे असतानाही त्यांचे अहवाल निगेटिव्ह येत आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात निवेदन जारी केले आहे. भारतात आढळत असलेल्या कोरोना विषाणूच्या या स्ट्रेनची चुकीचे किंवा खोटे अहवाल येण्याची शक्यता नाही. देशभरात रुग्णांची तीव्र लक्षणे असताना त्यांचे नकारात्मक अहवाल येत आहेत.
आरटीपीसीआर चाचण्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या किटद्वारे दोनहून अधिक नमुन्यांची चाचणी करता येते. त्यामुळे नमुन्यांकडे दुर्लक्ष करण्याची शक्यता कमी होते, असे सरकारचे म्हणणे आहे. भारतात आरटीपीसीआर किटचा दोनहून अधिकवेळा उपयोग होत असल्याने आरटीपीसीआर परीक्षण या म्युटेशनला ओळखू शकत नाही.
आरटीपीसीआर चाचण्यांची संवेदनशीलता आणि त्याचे वैशिष्ट्ये पहिल्याप्रमाणेच कायम आहे. आरटीपीसीआर किट वेळोवेळी अपडेट केले जातात, असे दिल्लीतील प्रयोगशाळेतील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आरटीपीसीआर चाचणीची संवेदनशीलता (वास्तविक सकारात्मकता ओळखण्याची क्षमता) ७० टक्के आहे, असे इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयाचे डॉ. राजेश चावला यांनी सांगितले. सध्या चाचण्यांसाठी जमा करण्यात येणारे नमुने हाताळण्यात काही त्रुटी असू शकतात. त्यामुळे कोरोना अहवाल नकारात्मक येणे शक्य आहे. किंवा विषाणूचा संसर्ग झाल्यावर लगेच चाचणी केल्यास किंवा संसर्ग झाल्याच्या अनेक दिवसांनंतर चाचणी केल्यासही अहवाल निगेटिव्ह येऊ शकतो, असे ते म्हणाले. कोरोनाची लक्षणे असताना अहवाल निगेटिव्ह आला तरीही लोकांनी एकमेकांपासून दूर राहावे, असे डॉ. चावला यांनी सांगितले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!