चांदवड– येथील उपजिल्हा रुग्णालय येथे ५० बेड चे नवीन कोविड-19 सेंटर सुरू होणार आहे. तसेच कोविड रुग्णांना लागणारी साधन सामग्री तात्काळ उपलब्ध करा अशी मागणी जिल्हा शल्यचिकित्सक व संबंधित अधिकारी यांच्याकडे आमदार डॉ.राहुल आहेर यांनी केली.
मंगळवारी चांदवड येथे उपजिल्हा रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या प्रमुख उपस्थितीत चांदवड देवळा विधानसभा मतदार संघाचे आमदार डॅा. आहेर यांनी बैठक घेतली. यावेळी चांदवड हे तालुक्याचे मुख्य व माध्यवर्गीय ठिकाण असून या ठिकाणी व सर्व तालुक्यात कोरोना संसर्गजन्य परिस्थितीने असल्याने अनेक व्यक्तींना या परिस्थितीत मुकाबला करावा लागत आहे. परंतु अशा स्थितीत चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर येथे उपचारासाठी बेड उपलब्ध केलेले आहेत. परंतु ते येथील लोकसंख्येच्या तुलनेत पुरेसे नाहीत. त्यामुळे येथे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे, सदर ठिकाणी तात्काळ नव्याने ५० बेडचे कोविड सेंटर उभारावे यासाठी यापूर्वी मागणी केली होती. जेणेकरून येथे त्यासाठी आवश्यक असणारे ट्रामा केअर जवळ उपजिल्हा रुग्णालय देखील आहे. त्यामुळे येथे तात्काळ ५० बेडचे कोविड सेंटर चालू झाल्यास गेल्या पंधरा दिवसांमध्ये जवळपास शंभर हुन अधिक रुग्ण हे वेटिंगला असून बरे होणाऱ्यांची संख्या व मृत व्यक्तींची संख्या ग्राह्य धरता येथे रोज पाच ते सहा बेड खाली होतात. पाच ते सहा रुग्णांचे नव्याने ऍडमिशन होते. यामुळे बाकी रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होताना दिसून येत आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी प्रशांत खैरे, प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, डॉ आत्माराम कुंभार्डे, डॉक्टर नितीन गांगुर्डे तहसीलदार प्रदीप पाटील, तालुका उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुशील शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी पंकज ठाकरे यांच्या समवेत चर्चा करून निर्णय घेण्यात आला.
त्याच प्रमाणात येथे ऑक्सिजन टॅंक, बेड, कर्मचारी वर्ग,रेमडीसीविर इंजेक्शन,मेडिसिन,यांचाही मोठ्प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला आहे. यासाठी देखील तात्काळ निर्णय घेऊन कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच ज्यावेळेस रुग्ण rt-pcr टेस्ट करतो त्यावेळी त्याचा रिपोर्ट तिसऱ्या ते चौथ्या दिवशी येतो तर तो त्या रुग्णास सांगण्यास तीन ते चार दिवस लेट होतो. त्यामुळे ती व्यक्ती अधिक बाधित होते. त्यामुळे त्याचा वेळ कसा कमी होईल या बाबत लक्ष घालावे. व्यक्ती उपजिल्हा रुग्णालय येथे मेडिसिन घेण्यास गेले असता त्यांना काही औषधे ही बाहेरून घेणे अपेक्षित असतांना देखील तेथील डॉक्टर त्यांना या डोस मधील काय बाकी व काय नाही हे स्पष्टपणे सांगत नाही किंवा लिहून देत नाही. त्यामुळे औषधे देतांना काळजी घेणे गरजेचे आहे.
यावेळी चांदवड शहरातील वेगवेगळ्या वैद्यकीय बाबत आलेल्या अडचणी बाबत व तात्काळ नवीन को बिल सेंटर चालू करणे बाबत भुषण कासलीवाल यांच्या स्वाक्षरीने आमदार डॉ राहुल दादा आहेर व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन दिले. तसेच स्थानिक विकास निधी अंतर्गत चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे दहा ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स (७ लिटर प्रति मिनिट) साठी १० लक्ष रु.चे पत्र जिल्हाधिकारी यांच्या नावे देण्यात आले. ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स मूळे ऑक्सीजन तयार करण्यार करण्यासाठी मदत होते तसेच ज्या रुग्णांची ऑक्सिजन लेवल कमी होते अश्या रुग्णांसाठी महत्वाचे आहे.
सोमवार पासून उपजिल्हा रुग्णालय येथे नवीन पन्नास बेडचे कोविड सेंटर सुरू होणार आहे अशी माहिती बैठकीच्या वेळी डॉक्टर राहुल आहेर यांनी दिली. यावेळी मनोज शिंदे विजय धाकराव योगेश ढोमसे मुकेश आहेर विशाल ललवाणी सचिन म्हैधूने वैभव धामणे ,सागर आहेर ,नितीन फंगाळ व इतर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.