लासलगाव –. निफाड तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढलेली असल्याने आज नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानुसार नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी निफाड तालुक्यातील लासलगाव येथे दोन तर उगाव व सायखेडा येथे प्रत्येकी एक असे चार प्रत्येकी पन्नास खाटांचे कोरीना रूग्णांकरीता केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. सध्या निफाड तालुक्यातील कोरोना बाधीत रूग्णाची संख्या २९७७ अशी आहे.
यासाठी आदेशही काढण्यात आले आहे. त्यात लासलगाव येथे दोन उगाव येथे व सायखेडा येथे प्रत्येकी एक असे चार ठिकाणी पन्नास खाटा असलेले केंद्र काढण्यास मान्यता दिली आहे. प्रत्येकी पन्नास खाटा मंजूर झाल्या आहेत लवकरच कार्यान्वित होणार असून त्यामुळे किमान दोनशे रुग्णांची उपचार होण्यास मोलाची मदत होणार आहे
पालकमंत्री यांच्या आदेशाने लासलगाव परिसरात दोन ठिकाणी कोविड सेंटर मंजूर झाले १) रॉयल पैलेस मंगल कार्यलय २) लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय येथे प्रत्येकी ५० खाटाचे सेंटर लवकर चालु होणार आहे. तसेच उगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यालय व सायखेडा येथे षटोकाचार्य महाविद्यालयात असे चार ठिकाणी पन्नास खाटाचे कोरोना रूग्णांकरीता खाटा असणारे केंद्र सुरू होणार आहे