इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – वाचकांना सातत्याने दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण विषयांची भेट करुन देणाऱ्या इंडिया दर्पणची विशेष लेखमाला आता अतिशय लोकप्रिय झाली आहे. त्यामुळेच या लेखमालेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. आता इंडिया दर्पणच्या वाचकांना दर बुधवारी नवे सदर भेटीला येत आहे. ही लेखमाला प्रसिद्ध जल अभ्यासक डॉ. प्रवीण महाजन हे लिहिणार आहेत.
डॉ. महाजन हे बुलडाणा जिल्ह्यातील मूळ रहिवासी असून गत अनेक वर्षांपासून नागपूर व विदर्भातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय आणि विशेषत्वाने जल व पर्यावरणाशी संबंधित कार्यात व्यक्तिगतरित्या आणि विविध संस्था, संघटनांच्या माध्यमातून कार्यप्रवण आहेत. पर्यावरण हा सुरुवातीपासूनच त्यांचा आवड आणि अभ्यासाचा विषय राहिला आहे. म्हणूनच स्वाभाविकपणे सामाजिक आणि राजकीय कार्यातही पाणी, नदी, धरण या विषयांना प्राधान्यक्रमाने स्थान मिळत गेले आहे.
महाराष्ट्र शासनाने २०२० मध्ये डॉ. शंकरराव चव्हाण राज्यस्तरीय जलभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. तसेच, राजस्थान मधील अलवर येथील सनराईज युनिव्हर्सिटीने जल क्षेत्रातील कार्यासाठी त्यांना डॉक्टरेट ही मानद पदवी बहाल केली आहे. पाणी वाचविण्यासाठीची जनजागृती, नवीन पिढीत विद्यार्थी दशेपासूनच जलजागृती करण्याचा प्रयत्न केल्यास नवीन पिढीला पर्यावरण व जल याविषयी माहिती होईल. भविष्यात त्यांचे हातून कुठलाही पर्यावरणाचा -हास होणार नाही याकरीता लिखाणासाठी ते प्रयत्नशील आहेत. आताही इंडिया दर्पणच्या लाखो वाचकांसाठी ते दर आठवड्याला पाणी आणि पर्यावरणाशी निगडीत विविधपूर्ण विषयांवर लेखन करणार आहेत. त्यांचाशी खालीलबाबींद्वारे संपर्क साधता येईल
डॉ. प्रवीण महाजन,
मोबाईल – 9822380111,
ईमेल – pravin5858@gmail.com
संपर्क – ‘आशीर्वाद’ 181, गोतमारे कॉम्प्लेक्स, धरमपेठ एक्स. नागपूर – 440010
New Column Environment Water Issues by Dr Pravin Mahajan
Article Series