बुधवार, ऑक्टोबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

किया इंडियाच्या या नवीन इलेक्ट्रिक वाहनाची बुकींग सुरु…

जानेवारी 19, 2025 | 5:28 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20250117 WA0123

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- किया इंडिया या आघाडीच्या मास प्रीमियम कार उत्पादक कंपनीने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मधून नवीन ईव्ही६ सर्वांपुढे आणली. नवीन किया ईव्ही६ साठी बुकिंग्ज आजपासून खुली होत असल्याचेही जाहीर करून किया इंडियाने ब्रॅण्डच्या इलेक्ट्रिक वाहन प्रवासामधील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला.

नवीन किया ईव्ही६ सुरक्षिततेबाबत सातत्याने नवीन मापदंड स्थापन करत आहे, ही कार एडीएएस २.० पॅकेजने सुसज्ज आहे. या पॅकेजमध्ये २७ अतिप्रगत सुरक्षितता व ड्रायव्हर सहाय्य सुविधा आहेत. यापूर्वीच्या ईव्ही6च्या तुलनेत पाच अतिरिक्त एडीएएस २.० सुविधांची भर या कारमध्ये घालण्यात आली आहे. या सुविधा पुढीलप्रमाणे: फ्रण्ट कोलिजन्स अव्हॉयडन्स असिस्ट (एफसीए)- शहर/पादचारी/सायकलस्वार/जंक्शन टर्निंग; फॉरवर्ड कोलिजन अव्हॉयडन्स (एफसीए)- जंक्शन क्रॉसिंग; फॉरवर्ड कोलिजन अव्हॉयडन्स- लेन असिस्ट चेंज (एफसीए) – ऑनकमिंग अँड साइड; फॉरवर्ड कोलिजन अव्हॉयडन्स असिस्ट (एफसीए)- इव्हेजिव स्टीअरिंग आणि लेन फॉलो असिस्ट (एलएफए). या सर्व सुविधा आमच्या ईव्ही9 या फ्लॅगशिप मॉडेलमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानातून विकसित करण्यात आल्या आहेत. यामध्ये दोन वाहनांमधील धडक टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षितता सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत तसेच वाहनाची बांधणी अधिक पक्की करण्यात आली आहे. गाडीत बसलेल्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्थाही सुधारण्यात आली आहे. वाढीव शक्ती आणि सुधारित एडीएएस पॅकेज यांमुळे तुम्ही ही कार अधिक आत्मविश्वासाने चालवू शकता. ईव्हीसिक्सचे डिझाइन अपघातांपासून वाचवण्याच्या दृष्टीनेच करण्यात आले आहे.

किया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ग्वांगु ली म्हणाले, “वाहन उद्योगातील सकारात्मक बदलाला चालना देण्यासाठी किया इंडिया वचनबद्ध आहे. ईव्ही६ प्रथम रस्त्यावर धावू लागल्यापासून, तिचे व्यापक स्तरावर कौतुक होत आहे, तिची लोकप्रियता वाढत आहे आणि जागतिक स्तरावरील लौकिकही अधिक दृढ होत आहे. आज नवीन ईव्ही6 सर्वांपुढे आणतानाही ही कार आपल्या नवीनतम हाय-टेक नवोन्मेषाच्या जोरावर इलेक्ट्रिक वाहतुकीच्या मानकांची व्याख्या नव्याने करेल अशी खात्री आम्हाला वाटत आहे.”

श्री. ली पुढे म्हणाले, “भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मधील आमच्या सहभागातून आमची बांधिलकी अधोरेखित होते. या प्रदर्शनादरम्यान आमच्या नवीन ईव्हीसिक्सचे अनावरण करणे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. कार्बनमुक्तीच्या दिशेने चाललेल्या आमच्या प्रवासातील हे महत्त्वाचे पाऊल आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक, अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतीय ग्राहकांना देऊ करण्याच्या दिशेने आम्ही मोठी झेप घेत आहोत.”

नवीन किया ईव्ही६: शक्ती, कामगिरी व नवोन्मेषासह इलेक्ट्रिक वाहनांतील आरामाची नवीन व्याख्या
कियाची नवीन ईव्ही6 म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील मोठी भरारी आहे. ही कार पूर्वीच्या गाड्यांहून अधिक शैलीदार, शक्तिशाली व तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सक्षम आहे. कियाच्या पहिल्यावहिल्या समर्पित ईव्हीची ताजी आवृत्ती म्हणून ही कार महत्त्वाचे अपग्रेड्स देऊ करते. त्यामुळे बाजारपेठेतील सर्वांत प्रगत इलेक्ट्रिक वाहनांपैकी एक म्हणून असलेले ईव्ही6चे स्थान अधिक भक्कम झाले आहे.

रचना किंवा डिझाइनबाबत सांगायचे तर, कियाच्या वैशिष्ट्यपूर्ण ‘ऑपोझिट्स युनायडेट’ डिझाइन भाषेनुसार, या मॉडेमधील पुढील भाग अधिक दणकट व आक्रमक आहे. कनेक्टेड डीआरएल्ससह नवीन खास स्टार मॅप लायटिंग, फ्रण्ट जीटी-लाइन स्टायलिंग बम्पर, ग्लॉसी फिनिश असलेली १९ इंची मिश्रधातूंची चाके आणि स्टार-मॅप एलईडी रीअर कॉम्बिनेशन लॅम्प्स आदी १५ सुधारणांसह, नवीन ईव्हीसिक्स अधिक दणकट, धारदार आणि या मालिकेतील पूर्वीच्या गाड्यांच्या तुलनेत अधिक गतीशील आहे.

आतमध्ये ईव्ही६ आणखी श्रेष्ठ दर्जाचे व प्रशस्त कॅबिन देऊ करते. हॅण्ड्स-ऑन डिटेक्शन तंत्रज्ञानासह डबल डी-कट स्टीअरिंग व्हीलसारख्या नवीन सुविधा ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक उंचीवर नेतात तसेच आराम व सुरक्षिततेची ग्वाही देतात. या वाहनाची सुधारित कामगिरीही छाप पाडणारी आहे. यामध्ये आता ८४-केडब्ल्यूएच क्षमतेची शक्तिशाली बॅटरी आहे, त्यामुळे गाडीचा पल्ला ६५० किलोमीटरहून अधिक वाढला आहे. पूर्वीच्या ७७.४ केडब्ल्यूएचच्या तुलनेत ही लक्षणीय सुधारणा आहे. ३२५ पीएस आणि ६०५ एनएम टॉर्क अशा ऊर्जा निष्पत्तीमुळे नवीन ईव्हीसिक्स अफलातून ड्रायव्हिंग अनुभव देते, तर ३५०-केडब्ल्यू क्षमतेचा वेगवान चार्जर केवळ १८ मिनिटांत १० ते ८० टक्क्यांपर्यंत जलद चार्जिंगची सोय करतो.

तंत्रज्ञानाबाबतही नवीन ईव्ही६ सरस आहे. नवीन ईव्ही६मध्ये ३१.२ सेंटीमीटर्सचा (१२.३ इंच) पॅनोरॅमिक कर्व्ह्ड डिसप्ले आहे, कनेक्टेड कार नेव्हिगेशन कॉकपिट या कियाच्या अत्याधुनिक इन्फोटेनमेंट प्रणालीचे एकात्मीकरण यात करण्यात आले आहे. हे वाहन किया कनेक्ट २.० तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. त्यामुळे किया कनेक्ट डायग्नोस्टिक्स आणि ओव्हर-द-एअर (ओटीए) सॉफ्टवेअर अपडेट्सचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय, डिजिटल की २.० (अल्ट्रा-वाइडबॅण्ड तंत्रज्ञानाने युक्त) तंत्रज्ञानामुळे अनुकूल स्मार्टफोनचे रूपांतर आभासी किल्लीमध्ये होऊ शकते आणि ते अत्यंत सोयीस्कर ठरू शकते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात भीषण आग… तंबू व साहित्य जळून खाक

Next Post

खो-खो महिला-पुरुष संघाने विश्व चषक जिंकला

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
GhqrE7 aEAE6hSZ 1024x621 1

खो-खो महिला-पुरुष संघाने विश्व चषक जिंकला

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011