गुरूवार, सप्टेंबर 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अविकसित गावांसाठी राज्य सरकार राबविणार हे अभियान

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 9, 2022 | 5:21 pm
in संमिश्र वार्ता
0
Hasan Mushrif 1 680x375 1

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातील अविकसित गावे दत्तक घेऊन त्या गावाचा सर्वांगिण विकास करण्याचे तसेच राज्यातील गावे सर्वच बाबतीत आदर्श बनविण्याचे माझे स्वप्न आहे. प्रत्येक गाव अधिकाधिक सुखी, समृद्ध व सक्षम करण्यासाठी तसेच दत्तक घेतलेली गावे ही आदर्श गावे बनविण्यासाठी जीवनविद्या मिशन, मुंबई आणि ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामसमृद्धी अभियान राबविण्यात येणार असल्याचे ग्रामविकास तसेच कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज सांगितले.

थोर समाजसेवक श्री वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशन ही समाजातील सर्व स्तरातील अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, पर्यावरण जागृती, स्त्री सन्मान, विद्यार्थी याबाबत संस्कार अभियान, कार्यशाळा असे विविध प्रकारची कार्य करत आहे. ग्रामीण भागातील जनतेसाठी जीवनविद्या मिशनने 60 गावे दत्तक घेतली असून त्यापैकी 20 गावांमध्ये जीवनविद्या मिशनने कार्य सुरू केले आहे. यातील 4-5 गावांमध्ये अतिशय परिणामकारक बदल दिसून आला असल्याने ग्रामविकास विभागाकडे जीवनविद्या मिशनने सादर केलेल्या ग्रामसमृद्धी अभियानाच्या प्रस्तावास मंजुरी दिली असल्याचे मंत्री महोदय श्री.मुश्रीफ यांनी सांगितले.

मंत्री श्री.मुश्रीफ यांनी सांगितले की, गावातील भौतिक विकासासाठी सरकारी, निमसरकारी तसेच खासगी संस्था, उद्योग समुहाचे आर्थिक सहकार्य मिळवून जीवनविद्या मिशनचे प्रशिक्षित कार्यकर्ते हे विकासकामे करणार आहेत. ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत घरोघरी करण्यात आलेल्या सर्व्हेचा अभ्यास करून तसेच ग्रामपंचायतीसोबत सभा घेऊन गावांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी भर देण्यात येणार आहे. यात हागणदारी मुक्त गाव, प्लास्टिक बंदी, शून्य कचरा मोहीम, घनकचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, स्त्री सन्मान, महिला सक्षमीकरण, महिला बचत गट, नोकरी किंवा व्यवसाय मागदर्शन, स्वयंरोजगार व रोजगार संधी, शेतकरी वर्गाला संघटित करणे, सरकारी योजना सर्वदूर पोहचविणे व राबविणे, शासकीय लाभ घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे, नैसगिक साधनसंपत्तीचा मोजका वापर करण्यास शिकवणे, गाव व्यसनमुक्त करणे, राष्ट्रहित भावना वृद्धींगत करून उत्कृष्ठ नागरिक घडवणे अशा विविध उद्दिष्टांवर भर देण्यात येणार आहे.

ग्रामसमृद्धीचे कार्य करण्यासाठी जीवनविद्या मिशन संस्थेला शासनाची सहयोगी मागदर्शक संस्था म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. मात्र जीवनविद्या मिशन, मुंबई या संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ग्रामसमृद्धी अभियानासाठी येणारा खर्च सरकारी योजनेतून करण्यात येणार नसून संस्थेमार्फत किंवा लोकवर्गणीतून करण्यात येणार आहे. या अभियानामुळे गावातील प्रत्येकाचा मानसिक, आध्यात्मिक, आर्थिक आणि शारिरीक स्तर उंचावणार असल्याची आशा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सिन्नर- भवानी डोंगराला अचानक आग; वनप्रस्थच्या स्वयंसेवकांनी मोठ्या प्रयत्नांनी विझवली

Next Post

पेठ आणि दिंडोरी तालुक्यातील रस्त्यांबाबत झाला हा निर्णय

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Government of India logo
संमिश्र वार्ता

देशभरातील पदव्युत्तर आणि पदवी वैद्यकीय शिक्षण क्षमता विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

सप्टेंबर 25, 2025
WhatsApp Image 2025 09 24 at 20.55.59 1024x576 1
संमिश्र वार्ता

बीडच्या प्राचीन कंकालेश्वर मंदिराच्या जतन, दुरुस्तीसाठी ९ कोटी १४ लक्ष रकमेस प्रशासकीय मान्यता

सप्टेंबर 25, 2025
Screenshot 20250830 073400 Chrome
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचा निकाल जाहीर…जिल्हास्तरीय स्पर्धेत नाशिकचे हे मंडळ विजेता

सप्टेंबर 25, 2025
G1oWoxaWwAAW4X e1758764683290
मुख्य बातमी

आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाची फायनलमध्ये धडक, सलग पाचवा विजय मिळवत बांगलादेशवर केली ४१ धावांनी मात

सप्टेंबर 25, 2025
Untitled 34
संमिश्र वार्ता

नवरात्र विशेष… बिकानेरची करणी माता… या मंदिरात असतात हजारो उंदीर… अशी आहे या मातेची महती…

सप्टेंबर 25, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना कठीण प्रसंग हाताळावे लागतील, जाणून घ्या, गुरुवार, २४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 24, 2025
Untitled 31
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई मिळणार…कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

सप्टेंबर 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

या इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम शाळेची मान्यता रद्द, विद्यार्थ्यांचे इतर शाळेत समायोजन

सप्टेंबर 24, 2025
Next Post
570

पेठ आणि दिंडोरी तालुक्यातील रस्त्यांबाबत झाला हा निर्णय

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011