– प्रणिता देशपांडे (हेग, नेदरलँड्स)
भारतीय दूतावास आणि गांधी केंद्र, हेगमधील ICCR ची सांस्कृतिक शाखा, नेदरलँड यांनी ‘आझादी का अमृत महोत्सव’ चा भाग म्हणून कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संदिप भट्टाचार्य (तबला) मार्टिजन बाईजेन्स (सरोद) आणि मोनिका अकिहारी आणि नील्स ब्राउवर डच गिटारवादक यांच्यासोबत बोई अकिह या एथनिक जॅझ ग्रुप्सच्या भारतीय आणि जॅझ म्युझिकचे चित्तथरारक सहकार्य होते. नेदरलँड्स (भारतीय दूतावास, द हेग) आणि गांधी सेंटर येथे गुरुवारी सायंकाळी नृत्यकथेचा साउंड ऑफ समर कॉन्सर्ट आणि बुक लॉन्च संप्पन झाला. राजदूत श्रीमती रीनत संधू यांनी ओडिसी नृत्यांगना जया मेहता यांनी लिहिलेल्या नृत्य कथा – इंडियन डान्स स्टोरीज फॉर चिल्ड्रन या पुस्तकाचे लोकार्पण केले. अनेक नृत्य प्रेमींनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.
The Hegue Netherland Indian Embassy Cultural program