महाराष्ट्र मंडळ , नेदर्लंड्स – गुढी पाडवा सोहळा २०२२
अॅड प्रणीता देशपांडे, नेदरलँड
मंडळी , यंदाचा गुढी पाडवा आमच्या “माझी शाळा” चे विद्यार्थी , आपल्यातलेच गुणी कलाकार आणि तुमच्या सगळ्यांबरोबर प्रत्यक्ष भेटीने साजरा करताना खूप आनंद झाला.
माझी शाळा टीम ने मुलांना गुढी पाडवा सणाची ओळख व महत्व आणि त्याच बरोबर मुलांचा आवडता हस्तकला वर्ग सुंदर रंगीबेरंगी गुढी बनवून साजरा केला. मुलांच्या आणि पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद हि विशेष बाब होती.
त्याच बरोबर आपण सगळे जण करोना च्या संकटातून बाहेर पडत आहोत. तेव्हा नवी आशा , नवी दिशा घेऊन नवीन वर्षात नव्या उमीदीने वाटचाल करावी ह्या हेतूने “चला , आता करूया उद्याची बात ” अशी एक सुंदर विविध गाणी , कविता वाचन ,नाट्यछटा ,अभिवाचन अशी विवध गुण व साहित्यमय मैफिल देखील रविवार , ४ एप्रिल २०२२ रोजी Poppens Theatre , Amstelveen येथे आयोजित केली होती.
ह्या मैफिलीचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्यातीलच Amsterdam , Amstelveen , Den Hauge , Breda , Nieuv – Vennep अश्या वेगवेगळ्या ठिकाणच्या कलाकारांनी प्रेक्षकांची उस्फुर्त दाद मिळवली. १५ हुन अधिक कलाकार आणि १५० हुन अधिक रसिक प्रेक्षकांच्या सहभागाबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत.
कार्यक्रमाचे मध्यंतर तर बटाटे वडे , चहा आणि त्या बरोबर नवीन -जुन्या मित्र मंडळींच्या गप्पन मध्ये रंगून गेला होता.
सर्व स्वयंसेवक , संचालक मंडळ , माझी शाळा चे सहकारी ह्यांचे मनापासून धन्यवाद !!
आपल्या पैकी बऱ्याच जणांची भेट झालीच पण ज्यांना यायला जमले त्यांच्यासाठी काही आठवणी पाठवत आहोत.