हेग (नेदरलँड) – कोरोना विषाणूच्या संसर्गाची चौथी लाट सध्या नेदरलँडमध्ये थैमान घालत आहे. त्यामुळेच सरकारने पुन्हा कडक निर्बंध लादले आहेत. याच निर्बंधांवरुन सध्या नेदरलँडमध्ये तणावाचे वातावरण तयार झाले. काही ठिकाणी तर नागरिक रस्त्यावर आले. जाळपोळ आणि दंगलीचे प्रकारही घडले आहेत. नेदरलँडमध्ये सध्या परिस्थिती नेमकी कशी आहे याची माहिती देत आहेत अॅड. प्रणिता देशपांडे. देशपांडे यांनी खास इंडिया दर्पणच्या वाचक-प्रेक्षकांसाठी हा व्हिडिओ पाठवला आहे. बघा, हा व्हिडिओ