इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आघाडीचा ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेटफ्लिक्सने आता एक नवीन फीचर आणले आहे. प्रोफाइल ट्रान्सफर असे या फीचरचे नाव आहे. यातून नेटफ्लिक्स डेटा ट्रान्सफर करता येणार आहे. मात्र, यातून पासवर्ड शेअर करणे थांबणार आहे.
नेटफ्लिक्सवर अनेक नवनवीन वेबसिरीज, चित्रपट येत असतात. ते पाहणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. यातूनच अनेकदा पासवर्ड शेअर करून या वेबसिरीज पहिल्या जातात. पासवर्ड शेअरिंग ही नेटफ्लिक्ससाठी एक महत्त्वाची समस्या आहे. यामुळे त्यांच्या महसुलावरही परिणाम होतो आहे. यामुळे नेटफ्लिक्स हे थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. नेटफ्लिक्सच्या ग्राहकांची संख्या कमी होण्यामागे हे महत्त्वाचे कारण मानले जात आहे.
एका ब्लॉगद्वारे नेटफ्लिक्सने ही माहिती दिली आहे. या फिचर अंतर्गत युझर्स त्यांचे गेम्स, सेटिंग्ज वगैरे यांसह त्यांचे संपूर्ण प्रोफाइल शेअर करू शकतात. हे फिचर सर्व नेटफ्लिक्स युझर्सना मिळणार आहे. तुम्ही नेटफ्लिक्सचे सदस्य असल्यास तुमच्या खात्यावर प्रोफाइल ट्रान्सफर फीचर उपलब्ध झाल्यावर तुम्हाला ईमेलद्वारे याची माहिती दिली जाईल. तुम्ही तुमचं प्रोफाईल कसं ट्रान्सफर करू शकता, याची माहिती पाहूया.
– तुमच्या फोन किंवा ब्राउझरवर नेटफ्लिक्स ओपन करा.
– प्रोफाइल ट्रान्सफर करण्यासाठी, “ट्रान्सफर प्रोफाइल” वर जा.
– होमपेजवर जा आणि नंतर ड्रॉपडाउन मेन्यूमधील आपल्या प्रोफाइल फोटोवर दिलेल्या पर्यायावरील
सूचनांचे पालन करा.
या नवीन फिचरमुळे नेटफ्लिक्स वापरू इच्छिणाऱ्यांना नेटफ्लिक्सचे अकाउंट उघडणे भाग आहे. एका अहवालानुसार, या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने २ लाख यूझर्स गमावले आहेत, जे दुसऱ्या तिमाहीत २० लाखांपर्यंत पोहोचू शकतात, असे नेटफ्लिक्सचे म्हणणे आहे. याशिवाय, जवळपास १० कोटींहून अधिक यूझर्स सबस्क्रिप्शनचे पैसे देत नाहीत आणि दुसर्याकडून पासवर्ड घेऊन नेटफ्लिक्सची सुविधा वापरतात.
Netflix Password Share Read this news