इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नेपाळ मध्ये कथित भ्रष्टाचार आणि फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अलिकडेच बंदी घातल्याबद्दल काठमांडूमध्ये लोकांनी सोमवारी सरकारविरुद्ध मोर्चा काढून निषेध केला. त्यानंतर सरकारने बंदी उठवली. पण, त्यानंतरही येथील असंतोष कायम होता. आज तरुणांनी कायदेमंत्री घर पेटवून दिले. संसद पेटवली. त्यानंतर ९ मंत्र्यांनी राजीनामा दिले. आता थेट पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर आता काठमांडूमध्ये जल्लोष केला जात आहे.
अगोदर राजीनामा देणा-या मंत्र्यामध्ये गृहमंत्री, कृषी, शिक्षण, आरोग्य, माहिती प्रसारण मंत्र्यांचा समावेश आहे. नागरिकांचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. लोकशाहीवर निर्बंध आणले जाऊ शकत नाही असे या मंत्र्यांचे म्हणणे आहे. या निषेध मोर्चात २५ जणांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक लोक जखमी झाले. त्यानंतर नेपाळच्या केपी शर्मा ओली सरकारने २६ सोशल मीडियावरील बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला. पण, तरी असंतोष संपला नाही. त्यानंतर पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे.
मोर्चात मोठ्या प्रमाणात तरुण सहभागी झाले होते. त्यानंतर काठमांडुमध्ये कर्फ्यू लावण्यात आला. तर दुसरीकडे युवक माघार घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला.
नेपाळमध्ये २६ प्रमुख सोशल मीडिया अॅपवर बंदी घालण्यात आली होती. या बंदीनंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली. फेसबुक, युट्युब, एक्स, इन्साग्राम, व्हॅाटसअॅप, सह लोकप्रिय प्लॅलफॅार्मवर सरकारने बंदी घातल्यानंतर तरुण रस्त्यावर उतरले होते. भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदी विरोधात निषेध करण्यासाठी तरुण रस्त्यावर उतरले होते.